मुंबई :- राज्य शासनाने नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाला पाच कोटी रुपये मंजूर केले होते, त्यापैकी ३ कोटी ७४ लाख रुपये आधीच वितरित करण्यात आले आहेत. हे इन्क्युबेशन सेंटर एलआयटी (लक्ष्मी नारायण तांत्रिक संस्था) येथे स्थापन करण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नोत्तर तासात दिली.
पाटील म्हणाले की, एलआयटीला हे इन्क्युबेशन सेंटर उभारण्यासाठी काहीसा वेळ लागतोय. तथापि, उर्वरित निधीही लवकर वेळी दिला जाईल. विधानपरिषद सदस्य विक्रम काळे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.