– दोन्ही तरुण उमेदवारांनी खोपडे व बावनकुळेंना घाम फोडला
नागपूर :- जय विदर्भ पार्टी तर्फे स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी घेऊन नागपूर जिल्ह्या मध्ये ५ विधानसभा क्षेत्रातील निवडणूक लढवित आहे. यांना परिवर्तन महाशक्ती तिसऱ्या आघाडीचा व खोरीप (उपेंद्र शेंडे) समर्थीत उमेदवार पूर्व नागपूर मधून विदर्भाचे युवा नेतृत्व मुकेश मासुरकर व कामठी विधानसभा क्षेत्रातून प्रशांत नखाते या दोन्ही युवकांनी स्वतंत्र विदर्भ राज्याकरता पूर्णपणे कंबर कसली असून घरोघरी जाऊन जनसंपर्क साधून मतदारांचा प्रतिसाद मिळात आहे. त्यामुळे पूर्व नागपूर चे आमदार कृष्णा खोपडे व कामठी क्षेत्रातील उमेदवार बीजेपी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना घाम फुटला. हलबा समाजाने पूर्व नागपूर मध्ये मुकेश मासुरकर ला समर्थन दिल्यामुळे चूरसीची लढत ठरत आहे. हलबा समाजाचे याभागात ४० हजार च्या वर मतदान असल्यामुळे विरोधकांचे धाबे दनाणले. जय विदर्भ पार्टी च्या वाढत्या प्रचाराने जनते मध्ये स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या २० तारखेला मतदानातून दिसून येणार.
जनसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोणातून २०० युनिट वीज घरघुती ग्राहकांना मोफत करून वीज दर निम्मे करण्यात येईल, स्मार्ट प्रीपेड मीटर विदर्भात लागूच देणार नाही, घरकुल योजने अंतर्गत गरजूना अनुदानची रक्कम घर बांधण्या करता ५ लाख रुपये करण्यात येणार, प्रत्येक घराला २४*७ स्वच्छ पाण्याची व्यवस्था नियमित करण्यात येईल, भव्य शासकीय रुग्णालय निर्माण करून रुग्णांना सेवा देण्यात येईल, झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पट्टे मिळवून देण्यात येईल, वर्ग १ ते वर्ग १२ पर्यंत सर्व विर्गातील घेटकांना मोफत शिक्षण देण्यात येईल. याप्रमुख मागण्याची पूर्तता करण्यासाठी जय विदर्भ पार्टीच्या उभे असलेल्या उमेदवारांनी विधानसभे मध्ये सेवा करण्या करता मतदान स्वरूपात आशीर्वाद देण्याची मागणी मतदारांना केली असून जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.