आयकर अधिकाऱ्यांनी डिजीटली सक्षम राहणे आवश्यक – नागपूरच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त रीना त्रिपाठी यांचे प्रतिपादन

– आयकर अधिकाऱ्यांमधून पदोन्नती मिळालेल्या आयकर सहायक आयुक्त यांच्या ‘उत्तरायण’ या प्रशिक्षण वर्गाचा समारोप संपन्न

नागपूर :- आयकर विभागात काम करत असताना आयकर अधिकाऱ्यांनी डिजीटली सक्षम राहणे आवश्यक असून आयकर विभागाच्या फेसलेस असेसमेंट, सायबर फॉरेंसिक्स तसेच डिजिटल सबमिशन यासारख्या उपक्रमांमध्ये कौशल्य संपादन करून ते करदात्यांना उत्तम सेवा उपलब्ध करून देवू शकतात असे प्रतिपादन नागपूरच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त रीना त्रिपाठी यांनी आज केले. आयकर अधिकाऱ्यांमधून पदोन्नती मिळालेल्या आयकर सहायक आयुक्त यांच्या ‘उत्तरायण’ या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी नागपूरच्या छिंदवाडा रोड स्थित राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकॅडमी एनएडीटी येथे त्या बोलत होत्या. याप्रसंगी एनएडीटीचे प्रशिक्षण महासंचालक आनंद बैवार,अतिरिक्त महासंचालक (प्रशासन) मनीष कुमार तसेच ‘उत्तरायण’ या प्रशिक्षणाचे प्रशिक्षण संचालक आणि अतिरिक्त महासंचालक आकाश देवांगण हे प्रामुख्याने उपस्थित होते.

आपण आयकर सहाय्यक आयुक्त म्हणून जेव्हा आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा प्रत्यक्ष फिल्ड वरील ट्रेनिंग हे विभागातील आयकर इन्स्पेक्टर यांच्याकडूनच मिळाले असे सांगतानाच रीना त्रिपाठी यांनी नव्याने पदोन्नती मिळालेल्या सहाय्यक आयुक्तांना आपल्या नियंत्रणाखालील परीक्षावधीन अधिकाऱ्यांना या खात्यामध्ये काम करण्याच्या संदर्भातील त्यांच्याकडे असलेल्या अनुभवाचे आदान प्रदान करण्याचे आवाहन केले. 

या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत पर भाषण एनएडीटीचे प्रशिक्षण महासंचालक आनंद बैवार यांनी केले .अतिरिक्त महासंचालक (प्रशासन) मनीष कुमार यांनी याप्रसंगी नवपदोन्नत अधिकाऱ्यांना कर प्रशासकाची शपथ दिली.या प्रशिक्षणाचे प्रशिक्षण संचालक आकाश देवांगन यांनी सांगितले की सात आठवड्यापेक्षा जास्त चालणाऱ्या या ‘उत्तरायण’ प्रशिक्षणामध्ये नवपदोन्नत सहाय्यक आयुक्तांना आयकर प्रशासनाच्या सर्व बाबींवर प्रशिक्षण दिले जाते .त्यांचे ज्ञान आणि कौशल्य वृद्‌धीकरीता तसेच कर संकलनात आणि कर चुकवेगिरीचा सामना करण्याचे प्रशिक्षण, मनी लॉन्ड्रींग या आर्थिक घोटाळ्यांसारख्या आर्थिक गुन्ह्याचा सामना करण्यासाठी तज्ञातर्फे सात महिने प्रशिक्षण दिले जाते.यामध्ये एक आठवड्याच्या भारत दर्शन कार्यक्रमाचादेखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी सहाय्यक प्रशिक्षण संचालक अरविंद कुमार वर्मा यांनी या तुकडीची माहिती दिली. या तुकडीमध्ये 131 अधिकारी प्रशिक्षणार्थी असून त्यापैकी 38 या महिला प्रशिक्षणार्थी आहेत. या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांमध्ये सर्वात जास्त संख्या महाराष्ट्र राज्यातल्या अधिकाऱ्यांची आहे. या तुकडीचे सरासरी वय 54 वर्ष असून या तुकडीतील अधिका-यांनी सुमारे 20 ते 25 वर्ष सेवा आपल्या विभागात दिल्यानंतर त्यांना ही पदोन्नती मिळाली आहे.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक प्रशिक्षण संचालक अभिनव मिश्रा यांनी केले.याप्रसंगी रीना त्रिपाठी यांनी एनएडीटी परिसरात वृक्षारोपण देखील केले.या कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी अधिकारी , एनएडीटी मधील अधिकारी तसेच आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

2030 पर्यंतच्या कालावधीसाठी रशिया-भारत आर्थिक सहकार्याच्या धोरणात्मक क्षेत्रांच्या विकासाबाबत दोन्ही नेत्यांचे संयुक्त निवेदन

Wed Jul 10 , 2024
नवी दिल्‍ली :- रशिया आणि भारत यांच्यात मॉस्को येथे 8-9 जुलै 2024 रोजी पार पडलेल्या 22 व्या वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेनंतर, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय व्यावहारिक सहकार्याच्या विद्यमान मुद्द्यांवर आणि रशिया-भारत विशेष आणि विशेषाधिकार धोरणात्मक भागीदारीच्या विकासाबाबत विचारांचे आदानप्रदान केले. परस्पर आदर आणि समानतेच्या तत्त्वांचे दृढतेने पालन करून, परस्पर फायदेशीर आणि दीर्घकालीन आधारावर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com