आयकर विभाग नागपूरतर्फे धर्मादाय संस्थेशी संबंधित आयकर कायद्यातील सवलत विषयक तरतुदी आणि नोंदणी संदर्भात जनजागृती कार्यक्रमाचे 26 जून रोजी आयोजन

नागपूर :- पुण्याचे कर-सवलत विभागाचे आयकर आयुक्त अभिनय कुंभार आणि नागपूरचे आयकर सहआयुक्त डॉ. भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक्झ्म्पशन रेंज, प्राप्तिकर विभागा तर्फे धर्मादाय संस्थेशी संबंधित आयकर कायद्यातील सवलत विषयक तरतुदी आणि नोंदणी संदर्भात एक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या 26 जून बुधवार रोजी दुपारी 4 ते 5.30 पर्यंत चाणक्य सभागृह, आयकर भवन सिव्हिल लाईन्स, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

धर्मादाय संस्थेशी संबंधित आयकर कायद्यातील सवलत विषयक तरतुदी आणि नोंदणीसाठी मूलभूत आवश्यकता तसंच धर्मादाय संस्थांच्या नोंदणी प्रक्रियेतील अलीकडील बदल हा या कार्यक्रमाचा मुख्य विषय आहे.

सनदी लेखापाल प्रणव अष्टेकर या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते असतील. सर्व विश्वस्त,कर्मचारी, प्राप्तिकर अभ्यासक आणि चार्टर्ड अकाउंटंट यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयकर विभागा व्दारे करण्यात आले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पूरपरिस्थिती नियंत्रणाबाबत मनपात कार्यशाळा 

Wed Jun 26 , 2024
नागपूर :-नागपूर महानगरपालिकेतर्फे “नागरी स्थानिक नियोजनासाठी नागपुरातील पुराचा धोका आणि उष्णतेच्या लाटेचे भौगोलिक-स्थानिक विश्लेषण” या विषयावर मंगळवारी कार्यशाळा (Geospatial Analysis of Flood Risk and Heat Wave in Nagpur City for Urban Local Planning) घेण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर होते. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!