मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांनी केलेल्या पूजेनंतर मंगळवारी (दि. २३) राजभवनातील एक दिवसाच्या श्रीगुंडी यात्रेचा प्रारंभ झाला.
यावेळी राज्यपालांनी देवीचे दर्शन घेतले व हार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसरातील महालक्ष्मी, महादेव, प्रभू राम व हनुमान यांच्या मूर्तींचे दर्शन घेतले.
गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी राजभवनातील एक दिवसाची यात्रा भरते.
राजभवनातील श्रीगुंडी देवीला साकळाई देवी व सागरमाता या नावांनी देखील ओळखले जाते.
पोलीस दलातर्फे यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Tue Jul 23 , 2024
नागपूर :- थोर भारतीय नेते, भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 आस्थापना उपायुक्त विवेक इलमे, विकास उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दीपाली मोतियेळे यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी […]