‘रिसायकल विथ रिस्पेक्ट’ वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्राचे उद्घाटन

मुंबई :- भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी मे. टाटा इंटरनॅशनल अँड टाटा मोटर्स कंपनीच्या सहकार्याने (“Re.Wi.Re) – ‘रिसायकल विथ रिस्पेक्ट’ या नावाच्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या ‘वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्र’ (आरव्हीएसएफ) चे 30 नोव्हेंबर रोजी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याहस्ते पुण्यात उद्घाटन केले. याप्रसंगी टाटा इंटरनॅशनल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव सिंघल, टाटा इंटरनॅशनल व्हेईकल ॲप्लीकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बत्रा, कार्यकारी संचालक गिरीश वाघ उपस्थित होते.

या नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्राची वर्षाला 25 हजार वाहनांची स्क्रॅपिंग क्षमता असणार आहे. यावेळी परिवहन आयुक्त श्री. भिमनवार म्हणाले की, टाटा इंटरनॅशनल व्हेईकल ॲप्लीकेशन्स सुरू करणे हा राज्यातील वाहन स्क्रॅपिंगचा व्यवसाय यशस्वी करण्याच्या प्रवासातील योगदानाचा आणखी एक मैलाचा दगड आहे. या सुविधा केंद्रात वाहनांच्या स्क्रॅपिंगची प्रक्रिया पर्यावरणपूरक व शासकीय नियमांचे पालन करणारी असेल. टाटा इंटरनॅशनल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक  सिंघल यांनी सुविधा केंद्रात सर्व प्रकारच्या प्रवासी व व्यावसायिक वाहनांचे स्क्रॅपिंग करण्यासाठी सुसज्ज असल्याचे सांगितले.

तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी बत्रा यांनी वाहन स्क्रॅपिंगच्या उद्योगातून टीआयव्हीए आणि टाटा मोटर्सने देशातील वाहनांचे जीवनचक्र बदलविण्याच्या दृष्टीकोनातून एक महत्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे सांगत वाहनांच्या पुनर्वापराची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच फायदेशीर असल्याचे सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहरात ‘ड्राय डे’ जाहीर

Wed Dec 4 , 2024
मुंबई :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ६ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई शहर जिल्ह्यातील ठोक व किरकोळ देशी, विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या एफ विभागाचे निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व अबकारी अनुज्ञप्त्या ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते दि. ६ डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस बंद राहणार आहेत, असे आदेश मुंबई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!