नागपूर :- ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वप्न भाजपचे, नागपूरकरांच्या निरामय आरोग्याचे! हा उद्देश सार्थ ठेवत नागपुरातील नागरिकांसाठी विशेषत: महिला व ज्येष्ठ नागरिकाना आरोग्य सेवा अल्प दरात देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडी नागपूर महानगर द्वारे लोकसेवार्थ रुग्णसेविकेचे लोकार्पण भाजप शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजप ग्रामीण अध्यक्ष सुधाकर कोहळे, आमदार प्रवीण दटके, डॉ मिलिंद माने,महामंत्री रामभाऊ अंबुलकर , वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ गिरीश चर्डे, महामंत्री डॉ श्रीरंग वराडपांडे, अजय मुखर्जी, आणि समस्त भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. ही रुग्ण वहिनी अल्प दरात रुग्णांना हॉस्पिटल मधून नेआण सुविधा, शिबिर व्यवस्था, अल्प दरात औषधी वाटप आदीसाठी प्रयत्नशील असेल. या साठी न्यू एरा हॉस्पिटल ची टीम कार्यरत असेल. याचा लाभ घेण्यासाठी ८०५५९९७७९९ या मोबाईल न. वर संपर्क साधावा.