नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. अमरावती रोडवरील लक्ष्मीनारायण तंत्रसंस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजय दुधे यांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन शनिवार, दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी पार पडले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटना व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कर्मचारी प्रत्यय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही पाणपोई सुरू करण्यात आली आहे.उद्घाटनीय कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश चिमणकर, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नितीन डोंगरवार, मॉलिक्यूलर बायोलॉजी विभागातील डॉ. दयानंद गोगले यांची प्रमुख उपस्थिती होती. मागासवर्गीय कर्मचारी संघटनेकडून मागील ५ वर्षापासून हा सामाजिक उपक्रम राबविल्या जात आहे. यावेळी मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश दखणे, कार्याध्यक्ष राजेश नानवटकर, महासचिव चंद्रमणी सहारे, दर्पण गजभिये, ललित मेश्राम, आकाश भगत, मनीष फुलझेले, रमेश सेवारे, महेंद्र पाटील, अरुण हट्टेवार, आनंद गटलेवार, सुरज सूर्यवंशी, राजेंद्र भलावी, दिलीप बागडे, विनोद मते, विलास बनसोड, मनोज इंगळे, रितेश पुरकाम, शरद बागडे, धनंजय सुखदेवे, प्रवीण गोतमारे, पंकज मांडवकर आदी उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पाणपोईचे उद्घाटन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com