– आजपासून तीन दिवस घेता येणार जल पर्यटनाची पर्वणी
नागपूर :- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मार्फत आयोजित नागपूर जल पर्यटन महोत्सव अर्थात नागपूर अॅक्वा फेस्ट २०२४ उद्घाटन आमदार परिणय फुके यांच्या हस्ते झाले. फुटाळा तलाव येथे आयोजित या विशेष कार्यक्रमास पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी, एमटीडीसीचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक दिनेश कांबळे उपस्थित होते. चे दि. १२ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
बोट सफारी, जेट स्की राईड्स, सेलिंग बोट, फ्लाइंग फिश राईड, बनाना राईड, बंपर राईड, वॉटर झोबिंग, इलेक्ट्रिक शिकारा, स्कूबा डायविंग जलक्रीडांचा थरारक अनुभव घेता येईल. विविध जल क्रीडा प्रकारांचा आनंद घेण्यासाठी माफक 20 ते 50 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 3 ते 6 अशी वेळ असणार आहे. नागपूरकरांनी या जल क्रीडा प्रकारांचा मोठ्या प्रमाणात आनंद घेण्याचे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी यांनी केले.