मनपा शालेय क्रीडासत्राचे उदघाटन,विज्ञान प्रदर्शनी व शिक्षक साहित्य प्रदर्शनी सोहळा संपन्न 

– 1700 विद्यार्थ्यांचा सहभाग

चंद्रपूर :- चंद्रपूर मनपा शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असल्यानेच मोठ्या प्रमाणात शहरातील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहे. यामुळे या शाळांमधील शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्त करून त्यांना फक्त शिकविण्याचेच काम करू द्यावे असे आवाहन आमदार सुधाकर अडबाले यांनी मनपा शालेय क्रीडासत्र, विज्ञान प्रदर्शनी उद्घाटन समारंभ प्रसंगी केले.

चंद्रपूर महानगरपालिका संचालित 27 शाळांचे शालेय क्रीडासत्राचे उदघाटन बुधवार 8 जानेवारी रोजी कोहिनुर क्रीडांगण येथे करण्यात आले. याप्रसंगी आयुक्त विपीन पालीवाल यांनी मनपाच्या शाळांची पटसंख्या वाढल्याचे तसेच विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व कौशल्यरित्या सादर केलेल्या शो ड्रिलचे कौतुक केले.

सदर क्रीडासत्र 3 दिवस चालणार असुन यात 1700 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.यात खो-खो,कबड्डी,गोळा फेक, रीले रेस, लांब उडी, वैयक्तीक कौशल्य इत्यादी विविध मैदानी खेळ खेळले जाणार आहेत. 3 दिवस विद्यार्थ्यांच्या भोजनाची तसेच मध्यान्हात दुध देण्याची व्यवस्था मनपातर्फे येणार आहे.

महात्मा फुले प्राथ. शाळा,भा. डॉ. भीमराव आंबेडकर शाळा, लोकमान्य टिळक प्राथ. शाळा यांच्यातर्फे शो ड्रील तर पी एम श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथ. व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांतर्फे स्वागत गीत व क्रीडा गीत सादर करण्यात आले तसेच लेझीम, बलुन ड्रील, समुह गान प्रस्तुत करण्यात आले. यावेळी . कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती बेत्तावार प्रमुख कार्यवाह यांनी केले .संचालन बबिता उईके,प्रविण आत्राम यांनी तर नागेश नीत,प्रशासन आधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले.

याप्रसंगी आयुक्त विपीन पालीवाल, शहर अभियंता विजय बोरीकर, सहा. आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, सहा. आयुक्त अक्षय गडलिंग, सहा. आयुक्त संतोष गर्गेलवार, प्रशासन अधिकारी (शिक्षण) नागेश नित, स्वाती बेत्तावार, परीक्षक मा.धनपाल फटिंग ,विस्तारअधिकारी पंचायत समिती चंद्रपूर, सारिका कुचनकर, सुमित बुरले किम पाहले. वामन कुमरे, सय्यद शहजाद, अरुण वलके,मधुकर मडावी, शरद शेंडे,राहूल पाचखंडे,अनिल गिरणारे,आनंद गेडाम, अमोल कोटनाके, प्रशांत आकनुरवार, शिवलाल इरपाते, भुषण बुरटे, संदीप जवादवार, उमा कुकडपवार ,संजना पिंपळशेंडे, परिणय वासेकर, विद्यालक्ष्मी कुंडले,उपस्थीत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मांगली (तेली ) येथे तीन दिवसीय मंडई निमित्त जंगी कुस्त्यांच्या आमदंगलीने आज पासून सुरुवात 

Fri Jan 10 , 2025
अरोली :- माजी जि प उपाध्यक्ष स्वर्गीय ज्ञानेश्वर साठवणे यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या खात – रेवराल जि. प , प स रेवराल अंतर्गत येणाऱ्या 56 वर्षाची परंपरा लाभलेल्या मांगली (तेली) येथे उद्या 10 जानेवारी शुक्रवारपासून तीन दिवसीय मंडईला जंगी कुस्त्यांच्या आम दंगलीने दुपारी दोन वाजता सुरुवात होणार आहे. 10 जानेवारी शुक्रवारला रात्री सात वाजता जय बजरंग नाट्य रंगभूमी देसाईगंज (वडसा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!