नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील मलखांब स्पर्धेला मंगळवार (ता.17) पासून सुरूवात झाली. महालक्ष्मी नगर येथे खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी व महाराष्ट्र मलखांब असोसिएशनचे अध्यक्ष राजाभाउ अधिकारी यांच्या हस्ते मंगळवारी स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी स्पर्धेचे प्रमुख प्रदीप केचे, कन्वेनर संदेश खरे, समन्वयक माजी नगरसेविका स्वाती आखतकर, माजी नगरसेवक भगवान मेंढे, माजी नगरसेविका लीला हाथीबेड, विद्या मडावी, देवेंद्र दस्तुरे, सेवकराम बावनकर, संदेश खरे आदी उपस्थित होते.
मलखांब स्पर्धेमध्ये १५० मुले आणि मुलींनी सहभाग नोंदविला असून स्पर्धा बुधवार 18 जानेवारीपर्यंत चालेल.