दुकान माणुसकीचे ‘माणुसकीचं आधार केंद्राचे’ मनपा आयुक्तांच्या हस्ते उदघाटन

दिवाळी साहित्य विक्रीतून मिळणार भिक्षेकऱयांना रोजगाराच्या संधी

नागपूर :- केंद्र शासन पुरस्कृत व नागपुर महानगरपालिका अंतर्गत आस्था भिक्षेकरी पुनर्वसन निवारागृहातील भिक्षेकरी ना  रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि ह्युमॅनिटी सोशल फ़ाऊंडेशन व सह्याद्री फ़ाऊंडेशन ने पुढाकार घेतला आहे.

दिवाळीच्या निमित्ताने लागणारे गृह सजावट साहित्य जसे आकाशदीवे, पणत्या, लाईट सिरिज आदि वस्तु तयार करण्याचे स्किल ट्रेनिंग ह्युमॅनिटी सोशल फ़ाऊंडेशन व सह्याद्री फ़ाऊंडेशन तर्फे भिक्षेकऱयांना देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान, भिक्षेकऱयांनी तयार केलेल्या साहित्यांची प्रदर्शनी व विक्री निर्मल गंगा अपार्टमेंट, निर्मल बॅंक, नंदनवन मेड रोड, नागपूर येथे आणि चिटणविस सेंटर,नागपूर येथे ‘माणुसकीच आधार केंद्र’ नावाने सुरू केलेल्या विक्री केंद्रात सुरू केले आहे.

सदर, विक्री केंद्राचे आज, उदघाटन राधाकृष्णन बी (IAS), आयुक्त, महानगरपालिका, नागपुर यांचे हस्ते झाले. यावेळी प्रकल्प समन्वयक सुभाष जयदेव, ह्यूमैनिटी सोशल फ़ाऊंडेशन च्या पूजा मानमोडे, सह्याद्री फ़ाऊंडेशनच्या साक्षी क्षीरसागर, आस्था भिक्षेकरी पुनर्वसन प्रकल्पचे अधिक्षक गौतम नागरे, प्रकल्प व्यवस्थापक शुभम माकोडे, राकेश गाठे आदि उपस्थित होते.

चला तर देवूया एक हात मदतीचा

भिक्षेकऱयांनी यात बाबुंपासून तयार केलेले आकाशदिवे, सजावटीचे साहित्य तयार केले आहे. नागपूरकरांनी या माणुसकीच्या केंद्रांना भेट देऊन, या सामाजिक कार्याला हातभार लावावा असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डॉ.कलाम यांचा जन्मदिन 'वृत्तपत्र विक्रेता दिन' म्हणून साजरा..

Sat Oct 15 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 16 :- पावसाळा असो की हिवाळा, भल्या पहाटे उठायचं. वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे. कोणी सायकलवरुन तर कोणी पायदळ चालत घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा नित्यक्रम पाळणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा १५ ऑक्टोबर हा सन्मान दिन. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’म्हणून आज कामठी वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने साजरा करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com