आई फाउंडेशनच्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन 

नागपूर :- शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत संस्था आई फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे शनिवारी 25 फेब्रुवारी रोजी उदघाटन झाले. 5 मार्च पर्यंत रेशीमबाग मैदानात ही स्पर्धा होणार आहे.रविवारी (ता.26) आमदार मोहन मते यांनी स्पर्धेला भेट दिली व खेळाडूंना प्रोत्साहित केले.स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला 1 लक्ष रुपये आणि विजयी चषक प्रदान करण्यात येणार आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 50 हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी 21 हजार रुपये आणि चवथ्या क्रमांकासाठी 11 हजार रुपये व विजयी चषक देण्यात येईल.याशिवाय अंतिम सामन्यात मॅन ऑफ द सिरीज 15 हजार रुपये, मॅन ऑफ द मॅच 10 हजार रुपये, बेस्ट बॉलर, बेस्ट ऑल राउंडर, हायेस्ट सिक्स यासाठी प्रत्येकी 5 हजार रुपये, हायेस्ट फोरसाठी 4 हजार रुपये, बेस्ट कॅच, बेस्ट फिल्डर, बेस्ट किपर, हॅट्ट्रिक, बेस्ट कॅप्टन, बेस्ट कॉमेंट्रेटर ला प्रत्येकी 3 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

The Governor of Himachal Pradesh Shiv Pratap Shukla calls on Raksha Mantri  Rajnath Singh in New Delhi on Sunday, February 26, 2023.

Mon Feb 27 , 2023
The Governor of Himachal Pradesh Shiv Pratap Shukla calls on Raksha Mantri  Rajnath Singh in New Delhi on Sunday, February 26, 2023.      Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!