राज्यपाल, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या नवीन सचिवालय इमारतीचे उदघाटन; मुख्यमंत्र्यांनी केली राज्यपालांसह पाहणी

मुंबई :-राज्यपालांच्या सचिवालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन आज (शुक्रवार, दि. १६) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांकडून देखील सचिवालयाची पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दौऱ्यावर जाणार असल्यामुळे त्यांनी सकाळीच राजभवन येथे जाऊन राज्यपालांसह नव्या सचिवालय इमारतीची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांसोबत बंदरे व खाणकाम मंत्री दादाजी भुसे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते.

इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारी यांचेसह संपूर्ण इमारतीची पाहणी केली.

यावेळी यावेळी कौशल्य विकास व महिला बाल कल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी व सहसचिव श्वेता सिंघल तसेच राजभवन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पर्यावरण स्नेही हरित इमारत असलेल्या या सचिवालयामध्ये राज्यपालांचे प्रधान सचिव, राज्यपालांचे परिवार प्रबंधक, सहसचिव, उपसचिव यांची कार्यालये असतील तसेच राजभवन सचिवालयातील प्रशासन शाखा, शिक्षण शाखा, आदिवासी कक्ष, वैधानिक विकास मंडळ आदी शाखांची कार्यालये असतील.

सचिवालय इमारतीमध्ये बैठकांसाठी छोटे सभागृह, ग्रंथालय तसेच अभिलेख जतन कक्ष देखील बांधण्यात आले आहे. 

यापूर्वीची राज्यपालांच्या सचिवालयाची इमारत सर्वप्रथम सन १९१२ साली बांधण्यात आली होती व अतिशय जीर्ण अवस्थेत आली होती. तीन वर्षांपूर्वी जुनी इमारत पाडून त्याच जागेवर नवीन इमारत बांधण्याचा निर्णय करण्यात आला. नव्या सचिवालय इमारतीमध्ये तळघर, तळमजला व पहिला मजला आहे.

जुन्या सचिवालय इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ ४५७.८४ चौमी होते, तर नविन सचिवालय इमारतीचे एकुण क्षेत्रफळ २२८६.०० चौमी इतके आहे.

सदर इमारतीच्या बांधकामासाठी हरित इमारतीचे नियम पाळण्यात आले आहे. इमारतीमध्ये ३० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प अंतर्भुत केलेला आहे त्यामुळे दर महिन्याला ३५०० युनिट इतकी ऊर्जेची बचत होणार असल्याचे सांगण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor, Dy CM inaugurate New Building of Governor’s Secretariat;CM inspects building with Governor

Sat Dec 17 , 2022
Mumbai :-Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari accompanied by Deputy Chief Minister Devendra Fadnavis inaugurated the new building of the ‘Governor’s Secretariat’ at Raj Bhavan, Mumbai on Fri (16 Dec). Earlier in the day, Chief Minister Eknath Shinde met the Governor and inspected the New Governor’s Secretariat building, before proceeding for his outstation tour. Minister of Ports and Mines Dadaji Bhuse […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com