यवतमाळ :- युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्यादृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राची स्थापना केली जात आहे. जिल्ह्यातीन 29 महाविद्यालयांमध्ये सुरू केलेल्या या केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दि.20 सप्टेंबरला वर्धा येथून ऑनलाईन उद्घाटन होणार आहे.
या केंद्रांमध्ये स्व.रामभाऊ कोसलगे उच्च माध्यमिक विद्यालय, पोखरी ता. महागाव, ईश्वर देशमुख इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी दिग्रस, अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ, बी.बी. आर्ट एन. बी. कॉमर्स अँड बीपी सायन्स कॉलेज दिग्रस, आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मारेगाव, पटलधमल वाधवाणी कॉलेज ऑफ फार्मसी यवतमाळ, आबासाहेब पारवेकर कॉलेज यवतमाळ, श्री शिवाजी महाविद्यालय मारेगाव, आयटीआय मारेगाव, गुरुदेव विद्या मंदिर अँड ज्युनिअर कॉलेज जवळा ता.आर्णी, गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड, सुधाकरराव नाईक इन्स्टिज्यूट ऑफ फार्मसी दिग्रस या केंद्रांचा समावेश आहे.
सोबतच डॉ.विराणी सायन्स ज्युनिअर कॉलेज राळेगाव, श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय पुसद, फुलसिंग नाईक कॉलेज पुसद, नूर जहा बेगम सलाम अहमद कॉलेज वणी, राजीव आर्ट्स कॉलेज पाटणबोरी, राजीव सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल झरी-जामणी, विनायकराव बापू देशमुख कॉलेज ऑफ नर्सिंग यवतमाळ, स्व.राजकमलजी भारती आर्ट्स, कॉमर्स अँड श्रीमती एस.आर.भारती सायन्स कॉलेज आर्णी, एम.बी.खान ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स यवतमाळ, वसंतराव पुरके आर्ट सायन्स जुनिअर कॉलेज बोरगडी ता. पुसद येथे केंद्र सुरु करण्यात आले आहे.
शासकीय आयटीआय घाटंजी, साई पॉलीटेक्निक किन्ही जवादे ता. राळेगाव, एस.पी.एम. सायन्स गिलानी आर्ट्स कॉमर्स कॉलेज घाटंजी, पृथ्वीराज देशमुख कॉलेज ऑफ नर्सिंग यवतमाळ, साक्षी देशमुख कॉलेज ऑफ नर्सिंग लोहारा, यवतमाळ, पृथ्वीराज देशमुख कॉलेज ऑफ फिजिओथेरपी लोहारा, कॉलेज ऑफ अँग्रीकल्चर दारव्हा अशा एकूण 29 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहेत.
या केंद्रात जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा, तसेच दि.20 सप्टेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला महाविद्यालयांच्या ठिकाणी आभासी पद्धतीने जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.