संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र – कामठी तालुक्यातील आजनी ( रडके ) येथे गुरुवार दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी कामठी मतदार संघाचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते २५ लक्ष आमदार निधीतून नूतनीकरण करण्यात आलेल्या हनुमान देवस्थान सभागृहाचे लोकार्पण तसेच पंचायत समिती सभापती उमेश रडके यांच्या निधीतून नव्याने बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क महिला उद्यानाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी यांच्या हस्ते गावातील सर्व नागरिकांना घराचे मालकी पट्टे वितरित करण्यात आले. तसेच गावात नव्याने मंजूर झालेल्या रस्त्यांचे भूमिपूजन सुध्दा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार देवराव रडके, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, पंचायत समिती सभापती उमेश रडके, कामठीचे तहसीलदार, बिडिओ अंजुशा गराटे, पोलीस पाटील बळवंतजी रडके, सरपंच सुनील मेश्राम, उपसरपंच दिनेश बडगे, भगवंतराव रडके, तुकाराम लायबर, दिवाकर घोडे, सर्व ग्राम पंचायत सदस्य, नामदेव भगत, बळवंतराव नेऊलकर, खुशाल विघे, गणपत झलके, सूर्यभान हेटे, सुधाकर विघे, संजय जीवतोडे, नारायण पारेकर, चुडामन वाणी, पुरुषोत्तम देशमुख, राहुल शेळके, जितेंद्र धंदरे, रितेश हरणे, निखिल भोयर, यांची विशेष उपस्थिती होती. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नवयुवक युवा मंडळ, वीर बजरंग क्रीडा मंडळ, जय बजरंग क्रीडा मंडळ व रेणुका क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांसह ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.