गडचिरोली :- आज दिनांक १२/०८/२०२३ रोजी उपपोस्टे रेसुंदा येथील नविन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन समारंभ तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या “पोलीस दादालोरा खिड़की” चे माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील जनतेचे जीवनमान उंचवण्याच्या उद्देशाने उपपोस्टे रेगुटा येथे आयोजित करण्यात आलेला भव्य महाजनजागरण मेळावा अन्न व औषध प्रशासन मंत्री, महाराष्ट्र राज्य, धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी उपविभाग सिरोंचा अंतर्गत उप-पोस्ट रेगुंता हद्दीतील एकुण १००० पेक्षा जास्त आदिवासी बांधव विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. उपस्थित आदिवासीयांना कार्यक्रमस्थळी विविध प्रकारचे साहित्यांचे वाटप करण्यात आले असून त्यात साडी, धोतर, व्हॉलीबॉल, क्रिकेट बॅट, स्प्रे पंप, नोटबुक कंपास बॉलपेन, चॉकेट, ताडपत्री, छत्री, वॉलीबॉल नेट, इत्यादी साहीत्यांचे वाटप करण्यात आले. सदर मेळाव्या प्रसंगी प्रास्ताविक करतांना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, उप-पोस्ट रेगुंठा येथील सर्व अधिकारी / अंमलदार यांनी कम्युनिटी पोलीसिंगचे काम चांगले केले असुन येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात १२० महिलांना उज्ज्वला गॅस कनेक्शन, शेतकऱ्यांना ५०% सवलतीच्या दरात बि-बियाने ६० आदिवासी जोडप्यांचा सामुहिक विवाह व शासकीय कागदपत्रे मिळवून देणे अशा प्रकारचे बरीच चांगली कामे केली गेली आहेत.
सदर कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासन मंत्री, महाराष्ट्र राज्य, धर्मरावबाबा आत्राम यांनी उपस्थित नागरीकांना संबोधीत करतांना सांगीतले की, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे पोलीसांचे काम आहे, पण गडचिरोली पोलीस त्यापलीकडे जावून सामाजीक बांधिलकी जपत “पोलीस दादालोरा खिडकीच्या” माध्यमातुन या ठिकाणच्या लोकांसाठी विविध योजना राबवित आहेत. हो खरच अभिनंदनीय बाब आहे. नागरिकांनी देखील पोलीस दलाला जास्तीत जास्त सहकार्य करावे व स्वतःचा विकास साधावा. तसेच पोलीस उप महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र संदीप पाटील यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, सर्वांनी शिक्षण घेतले पाहीजे, शैक्षणिक दृष्टया आपण प्रगत झाले पाहीजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून शिक्षणाचा अधिकार दिला आहे. त्यांचे विचार जोपासून आपण आपली उन्नती करून घेतली पाहीजे, तसेच उप-पोस्टे रेगुवा बेखील सर्व पोलीस अधिकारी / अंमलदार यांची स्तुती केली.
आतापर्यंत गडचिरोली प्रशासनाकडून पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ५५१, नर्सिंग असिस्टंट १२३७, हॉस्पिटलटी ३२३, ऑटोमोबाईल २७६ ईलेक्ट्रीशिअन २०१, सेल्समैन ०५, कंपनी रोजनदारी १५५, प्लम्बांग ३५ बेल्डींग ३८, जनरल ड्युटी असिस्टंट ३८४, फील्ड ऑफीसर ११ व जीएलई ५२ असे एकुण ३२६८ गडचिरोली जिल्ल्यातील युवक/युवतीना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १७४, कुक्कुट पालन ५८५, बदक पालन १०० शेळी पालन १७७ शिवणकला २७७, मधुमक्षिका पालन ५३, फोटोग्राफी ६५, सॉफ्ट टाईज ७० एमएससीआयटी २३१, वाहन चालक ५९२, भाजीपाला लागवड १३९५ पोलीसभरती पूर्व प्रशिक्षण १०६२, फिलर दुरुस्ती १३४, मत्स्यपालन ११२, वराहपालन १०, फास्ट फूड १३०, पापड लोणचे ५१, कराटे प्रशिक्षण ४८ असे एकुण ५२७४ युवक/युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर भव्य जनजागरण मेडाव्याच्या कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन मंत्री, महाराष्ट्र राज्य, धर्मरावबाबा आत्राम, पोलीस उप महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र संदीप पाटील, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा सुहास शिंदे हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप-पोस्टे रेगुठाचे प्रभारी अधिकारी विजय सानप, सपोनि कृष्णा काटे, पोउपनि सागर पाटील, पोउपनि सय्यद निजाम व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.