नागपूर जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Ø ३१ जानेवारी पर्यंत मानकापूर क्रीडा संकुल येथे आयोजन

नागपूर :-  जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय महसूल व सांस्कृतिक स्पर्धेचे आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या हस्ते मानकापूर विभागीय क्रीडा संकुल परिसरातील मैदानावर थाटात उद्घाटन झाले.

जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी स्पर्धेत सहभागी स्पर्धकांची भेट घेवून संवाद साधला व त्यांना प्रोत्साहन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने दरवर्षी जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. वर्ष २०२४-२५ च्या स्पर्धेचे आज उद्घाटन झाले. अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महामुनी यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून तसेच हवेत फुगे सोडून या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यानंतर स्पर्धेत सहभागी संघांचे पथसंचलन झाले. मान्यवरांनी उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

उपविभागीय कार्यालय मौदा, सावनेर, उमरेड, काटोल, रामटेक यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय आणि उपविभागीय कार्यालय नागपूर ग्रामीण असे एकूण आठ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. कोतवाल, तलाठी, महसूल सहायकापासून अधिकारी यांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

महामुनी यांनी पुरूषांच्या ४५ वर्षा खालील गटात १०० मिटर धावण्याच्या स्पर्धेस हिरवी झेंडी दाखवून या स्पर्धांचेही औपचारिक उद्घाटन केले.

यावेळी पथसंचलनाचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय नागपूरने पथसंचलनात पहिला क्रमांक पटकाविला, उपविभागीय कार्यालय काटोल दुसऱ्या तर उपविभागीय कार्यालय उमरेड तिसऱ्या स्थानावर राहिले.

हिंगणा नायब तहसीलदार सुजाता गावंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ३१ जानेवारी २०२५ पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विद्यार्थी परिषद तुमचे व्यक्तिमत्व घडविणार आहे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Wed Jan 29 , 2025
– अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५३वे विदर्भ प्रांत अधिवेशन नागपूर :- आजचा नागरिक कसा असावा, त्याला उत्तम नागरिक म्हणून कसे घडविले पाहिजे, याला व्यक्तिनिर्माण म्हणतात. हेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सांगितले जाते. आपण कार्यकर्त्याला गुणदोषांसह स्विकारत असतो. कारण कुणीही परफेक्ट नाही. आपण सगळे अपुर्णांक आहोत. आपण विद्यार्थी जीवनात विद्यार्थी परिषदेत काम करताना आपले व्यक्तिमत्व कसे घडविले जाणार आहे, याचे चिंतन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!