येरखेड्यात दिवसाढवळ्या तारा माता मंदिरातील दानपेटीतुन दान रक्कम चोरीला.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

– बारा हजार रुपये लंपास, 

-अज्ञात चोराविरोधात नवीन कामठी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

कामठी ता प्र 30:-स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील तारा माता मंदिर न्यू येरखेडा येथे दिवसाढवळ्या सायंकाळी पाच वाजता सुमारास अज्ञात चोरांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून मंदिराच्या आतील दानपेटी फोडली व त्यातील अंदाजे दहा ते बारा हजार रुपये अज्ञात चोराने लंपास केले असून अज्ञात चोराविरोधात नवीन कामठी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तारा माता मंदिर चौक परिसरातील तारा माता मंदिरात चे मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून मंदिराचे आतील दानपेटी फोडून अज्ञात चोरांनी दहा ते बारा हजार रुपये चोरून नेल्याची घटना सायंकाळी पाच वाजता सुमारास घडली असून मंदिराचे पुजारी कमलेश शहारे सायंकाळी सहा वाजता सुमारास मंदिरात सायंकाळची आरती करण्याकरिता गेले असता त्यांना त्याला कुलूप तुटलेले दिसून आले त्यांनी घटनेची माहिती मंदिर पंच कमिटीच्या सदस्यांना व नवीन कामठी पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस उपनिरीक्षक प्रवीण रणदिवे सहकार्यसह घटनास्थळी येऊन पंचनामा करून अज्ञात चोराविरुद्ध नवीन कामठी पोलीस स्टेशनला कलम 380 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण रंधई ही पुढील तपास करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

माजी पार्षद हाजि आसिफ़ सिरमतिया की प्रदेश महासचिव पद पर नियुक्ति। 

Mon May 1 , 2023
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी        कामठी ता प्र 1 :- महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी अल्पसंख्यक विभाग की सूची हाल ही में प्रकाशित हुई है जिसमें शहर के जाने माने युवा नेता और माजी पार्षद हाजि आसिफ़ सिरमतिया को प्रदेश के महासचिव पद पर नियुक्त किया गया और ईद मिलन व कौमी एकता समारोह में आए महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com