वाडी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी तारीख ०२ ला दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून आला.जवळपास ६९ दिवसांनी राज्य मंडळातर्फे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला.त्यामुळे गेल्या काही दिवसापासून निकालाची वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थी पालकांची प्रतीक्षा अखेर संपली.
# वाडीतील जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून प्रथम क्रमांक गौरी रिनायत ८४.६० टक्के, द्वितीय आरजू बारसागडे ८४.६० टक्के, तृतीय नंदिनी सहारे ८१.६० टक्के गुण प्राप्त केले असून शाळेचे प्राचार्य उमेश चौरे, संचालक युवराज चालखोर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
# प्रगती विद्यालयाचा निकाल ९२.५९ टक्के लागला असून प्रथम पूर्वा राजेश रेवतकर ९०, द्वितीय समीक्षा अनिल आमधरे ८७.६०,तृतीय अंशू निलेश धाकडे ८५.८० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका नंदिनी पोजगे,संचालक प्रियंका देशमुख,अतुल देशमुख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
# श्री.विश्वनाथ बाबा हायस्कूल वाडी येथील एकूण १७६ विद्यार्थ्यां पैकी १६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९३.१४ लागला आहे. प्रथम क्रमांक तेजस्विनी सुनील भाकरे ८६ टक्के, द्वितीय प्रणय विजय शिंदे ८१.४० टक्के तर तृतीय नीलिमा महादेवराव वाघाडे ८०.४० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे.शाळेचे प्राचार्य राजेश बिडवाईक,
संचालक राजेश जयस्वाल सह धनराज थोटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.