विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना शिष्टमंडळाचे निवेदन व चर्चा!
वाडी (प्र): मागील अडीच वर्षापासून वाडी नगर परिषदेत लोकप्रतिनिधी नसल्याने बरीच विकास कामे खोळंबली आहेत. परंतु अडीच वर्षा आधी लोकप्रतिनिधी असतांना सभागृहात सर्वांनुमते मंजूर झालेले ठराव,त्यासाठी लागणारा निधी मंजूर करण्यासह इस्टिमेट तयार करून तांत्रिक मान्यता मिळवून सदर कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे पाठविले असता ते मागील दोन वर्षापासून प्रलंबित आहेत. ही जनहित कामे मार्गी लावण्यासाठी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिस्टमंडळ विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना भेटून निवेदन देऊन या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना देण्याची विनंती केली.
वाडी परिसरात अनेक जनहीताची कामे प्रलंबित असल्याने नागरिक त्रस्त आहे.त्या मध्ये आंबेडकर नगर वाडी,टेकडी वाडी येथील स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करणे,अमरावती महामार्गावर उघड्यावर असलेल्या मांस दुकानांसाठी मटन मार्केटची व्यवस्था करणे, अमरावती महामार्गावरच भाजी बाजार बसत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून यासाठी नियोजित भाजी मार्केटची व्यवस्था करणे,चा समावेश आहे इ.समस्या सह खास करून 1 लाख जनता शासकीय आरोग्य सुविधेपासून वंचीत आहे .वाडीत ग्रामीण रुग्णालया चा प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला असूनही जिल्हाधिकाऱ्यांनी याला अजून पर्यंत प्रशासकीय मान्यता का दिली नाही ? असा प्रश्न हे पदाधिकाऱ्यांनि निदर्शनास आणून दिला. यासाठी वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय देशमुख व प्रशासक इंदिरा चौधरी यांना याबाबत वारंवार निवेदन देऊनही हे अधिकारी या समस्याकडे दुर्लक्ष करीत आहे.या शिष्टमंडळात सामील वाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जि.प.सदस्य दिनेशचंद्र बंग,माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे, माजी गटनेते राजेश जयस्वाल, माजी नगरसेवक श्याम मंडपे, प्रदेश महासचिव ओबीसी विभाग प्रा.सुरेंद्र मोरे, वाडी शहर कार्याध्यक्ष हिम्मत गडेकर इं.नी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे लक्ष वेधून जिल्हाधिकार्यांनी मागील अडीच वर्षापासून रखडलेल्या फाइल्स वर तातडीने कारवाई करण्यासाठी तातडीने कार्यवाहीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आलेली आहे.या संदर्भात योग्य कार्यवाही करून दिलासा देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी शिष्टमंडळाला दिले.