कचरा संकलना करिता मनपाच्या नव्याने 30 वाहने सेवेत

नागपूर :- नागपूर शहरातील कचरा संकलनाचे कार्य अधिक चांगले व्हावे तसेच नागरिकांना चांगली सोयी सुविधा व्हावी याकरिता नागपूर महानगरपालिका द्वारे नवीन 30 वाहने खरेदी करून त्यांना कचरा संकलनाचे कामाकरीता भाडेतत्त्वावर एजन्सीला मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे हस्ते हस्तांतरित करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त आँचल गोयल, उपायुक्त विजय देशमुख, उपायुक्त प्रकाश वराडे, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख. डॉ. गजेंद्र महल्ले व इतर अधिकारी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिका द्वारा कचरा संकलन व वाहतूक करिता दोन एजन्सी नियुक्त केल्या आहेत. मे. ए.जी. इंविरो. प्रा. लि. यांचेकडे झोन क्र.1 ते 5 या झोन ची व मे. बी. व्ही.जी. इंडिया लि. यांचेकडे झोन क्र 6 ते 10 या झोन मधील घराघरांतून कचरा संकलन करून वाहतूक करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

दोन्ही एजेन्सीला कचरा संकलनाकरिता वाहनांच्या संख्येमध्ये वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु पुरेशा प्रमाणात वाहन वाढविण्यात आले नाही. त्याकरिता दोन्ही एजन्सी विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच यामधून महानगरपालिका द्वारे कचरा संकलनाचे नवीन वाहन खरेदी करण्यात आली. एकूण 30 वाहने खरेदी करण्यात आली असून या नवीन वाहनांमुळे कचरा संकलनाच्या कामामध्ये नियमितता दिसून येईल. शहरातील ज्या भागांमध्ये वाहने अनियमितरित्या घराघरामधून कचरा संकलन होत होत्या अशा भागांमध्ये या वाहनांचा वापर करून या परिसरातील कचरा संकलनाचे कामामध्ये सुधारणा होणार आहे. यामुळे अशा परिसरतील कचरा जमा होणारे ठिकाणांचे प्रमाण कमी करून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात मदत होणार आहे.

या वाहनांची संपूर्ण देखभाल व मनुष्यबळ कचरा संकलन करणाऱ्या दोन्ही एजन्सी मार्फत करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मराठा लॉन्सर्स ची दुहेरी विजेतेपदावर मोहोर - खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धा

Wed Jan 22 , 2025
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेत सबज्यूनिअर मुले आणि सीनिअर महिला गटामध्ये मराठा लॉन्सर्स महाल संघाने दुहेरी विजेतेपदावर मोहोर उमटविली. विभागीय क्रीडा संकुल मानकापूरच्या इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा पार पडली. सबज्यूनिअर्स मुलांच्या अंतिम फेरीत मराठा लॉन्सर्स महाल संघाने विद्यार्थी युवक जुना सुभेदार संघाचा ४५-४४ ने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. सबज्यूनिअर्स […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!