नागपूर :- नागपूर आणि वर्धा शहरांसह महावितरणच्या नागपूर परिमंडलात गेल्या आर्थिक वर्षात सर्व वर्गवारीत 84 हजार 672 नवीन लघुदाब वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यापैकी तब्बल 65 हजार 27 घरगुती, 10 हजार 507 वाणिज्यिक, 1349 औद्योगिक आणि 5 हजार 551 कृषी जोडण्यांचा समावेश आहे. याशिबाय परिमंडलात तब्बल 42 ईवाहन चार्जिंग स्टेशनला वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
ग्राहकसेवा अधिक गतिमान करण्यासाठी नवीन वीजजोडणी तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी ‘महावितरण’चे अध्यक्ष आणि संचालक व्यवस्थापकीय लोकेश चंद्र यांनी नवीन वीज जोडण्यांचा वेग वाढविण्यावर भर दिला आहे.. महावितरणच्या नागपूरचे परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनात आणि मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात नागपूर परिमंडलात ‘इज ऑफ़ लिव्हींग’ या संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना तातडीने सेवा दिल्या जात आहेत. यापुर्वी महावितरण’च्या नागपूर परिमंडलामध्ये दर वर्षी साठ ते सत्तर हजार वीजजोडण्या दिल्या गेल्या, मागिल आर्थिक वर्षात नवीन वीजजोडण्या देण्याच्या कामाला नियोजनपूर्वक वेग देण्यात आल्या असून 2023-24 मध्ये तब्बल 84 हजार 672 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
नियमित आढावा
नव्या जोडण्यांसाठी आवश्यक वीजमीटरचा तत्काळ पुरवठा करण्यासाठी ‘महावितरण’च्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि नागपुर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके नियमितपणे विभागनिहाय आढावा घेतात. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढला आहे. एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत 84 हजार 672 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. कुक्कुटपालन, यंत्रमाग, शितगृह, सार्वजनिक सेवा, सार्वजनिक पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट, तात्पुरत्या धार्मिक आणि इतर वर्गवारीत देखील प्रबावी कामगिरी करीत वर्षभरात तब्बल 2196 नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या.
दरमहा सरासरी 7 हजारावर जोडण्या
नागपूर परिमंडल’ अंतर्गत यापूर्वी दरमहा 5 ते 6 हजार नवीन वीजजोडण्या देण्यात येत होत्या. हा वेग गेल्या आर्थिक वर्षात (2023-24) दरमहा सरासरी 7 हजारावर वर गेला. मागिल आर्थिक वर्षात 84 हजारांहून अधिक नवीन वीजजोडण्या देण्याची नागपूर परिमंडलाची कामगिरी आनंददायी आणि समाधान देणारी आहे. हा वेग आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृती मानकांप्रमाणे निश्चित कालावधीत वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी सर्व अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी कटिबद्ध असल्याची ग्वाही नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली.
वर्गवारी नुसार नवीन वीज जोड
वर्गवारी नागपूर ग्रामीण मंडल नागपूर शहर मंडल वर्धा मंडल नागपूर परिमंडल एकूण
घरगुती 16979 38858 9190 65027
वाणिज्यिक 1963 6670 1874 10507
औद्योगिक 496 613 240 1349
कृषी 2743 234 2574 5551
ई वाहन चार्जिंग 10 29 03 42
इतर 724 1058 414 2196
एकूण 22915 47462 14295 84672
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर