नागपूर – महानगरपालिकेतर्फे प्रजासत्ताक दिन कार्यक्रम २६ जानेवारीला सकाळी ८ वाजता मनपा केंद्रीय कार्यालयातील हिरवळीवर आयोजित करण्यात आला आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल.
यावेळीउपमहापौर मनीषा धावडे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे उपस्थित राहतील. कोव्हिड नियमांचे अनुसरून कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
Tue Jan 25 , 2022
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार भंडारा, दि. 25 : मतदान ही लोकशाहीतील महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे मतदारांनी सजगतेने मतदान करण्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, उपविभागीय अधिकारी भंडारा रवींद्र राठोड आदी उपस्थित होते. मतदार […]