जानेवारी महिन्यात महानाट्य व महासंस्कृती आयोजनाची मेजवानी

– जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्या विविध समित्या*

नागपूर :- नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाला उंचीवर नेणाऱ्या दोन मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी जिल्हावासियांना जानेवारी महिन्यात मिळणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत एक महानाट्य व महासंस्कृती मेळाव्याचे आयोजन होत असून या आयोजनासाठी आवश्यक समित्यांची घोषणा आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या या बहुआयामी उपक्रमाची सुरुवात नागपूर येथूनच करण्यात येईल, अशी सूचना केली आहे. त्यांच्या सूचनेवरून प्रशासन या आयोजनाची तयारी करीत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजन करण्यात येत असून विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला संस्कृतीचे जतन, संवर्धन तसेच स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात लढवय्यांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सवाचे तसेच महानाट्याचे आयोजन जाहीर केले आहे.

कला, साहित्य, संस्कृती क्षेत्रातील देश पातळीवरील विख्यात व्यक्तींचे सादरीकरण या सोबतच स्थानिक कलागुणांना वाव देण्यासाठी महासंस्कृती महोत्सवाच्या आयोजन करण्यात येत आहे.

तसेच महाराष्ट्रावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीमत्वावर आधारित महानाट्य आयोजन करण्यात येणार आहे. महानाट्य दोन किंवा तीन दिवसांचे तर महासंस्कृती मेळावा पाच ते सहा दिवसांचा होणार आहे. यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या मार्गदर्शनातील बैठकीला विभाग प्रमुख उपस्थित होते. रामटेकचे आमदार अॅड.आशिष जायसवाल यांची देखील बैठकीला उपस्थिती होती.

आयोजनासाठी आवश्यक असणाऱ्या कार्यक्रम आयोजन, तांत्रिक मान्यता,वाहतूक , निमंत्रण व प्रसिद्धी विषयक समित्यांची आज घोषणा करण्यात आली. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत अधिकृतपणे कार्यक्रमांच्या तारखा व येणाऱ्या कलाकारांच्या संबंधीच्या माहितीची घोषणा होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जनतेने घाबरून जाऊ नये, नागपूर जिल्हयात मुबलक पेट्रोल व गॅस साठा : जिल्हाधिकारी

Wed Jan 3 , 2024
Ø गरज पडल्यास पंप व पुरवठाधारकांनाही पोलीस संरक्षण नागपूर :- नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व पेट्रोल पंपावर पुरेशा प्रमाणात पेट्रोल, डीझेल व गॅसचा साठा उपलब्ध आहे.याशिवाय पेट्रोल पंपांना पुरवठा करणाऱ्या डेपोमध्ये मुबलक साठा उपलब्ध आहे. गरज पडल्यास पोलीस संरक्षणात पेट्रोल पुरवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी इंधन संपल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 जिल्ह्यात कालपासून ट्रक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com