मुंबई :- जयपूरच्या रामदासी मठाचे प्रमुख पू. आचार्य धर्मेंद्र यांच्या निधनाने समाजाला नवीन दिशा देणारा एक प्रखर धर्माचार्य आपण गमावल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आचार्य धर्मेंद्र हे देशातील हिंदू समाजाला नवी दिशा देणाऱ्या धर्माचार्यात प्रमुख होते. त्यांच्या भाषणांमुळे देशभरात एक नवचैतन्य निर्माण झाले. हिंदू समाजात सुधारणा करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. जयपूरच्या रामदासी मठाचे परंपरागत प्रमुख असल्याने त्यांचे महाराष्ट्राशी एक वेगळेच भावूक नाते होते. श्रीराम त्यांना सद्गती देवो, मी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि अनुयायांच्या दुःखात सहभागी आहे.