जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील नागरिकांचे पहिल्या डोसचे शंभर टक्के लसीकरण

भंडारा : जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील नागरिकांच्या वयोगटातील पहिल्या डोसचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जिल्ह्यामध्ये 8 लाख 97 हजार 210 लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस 83 टक्के नागरिकांनी घेतला आहे.

जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला चांगले यश मिळाले असून 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यामध्ये मिशन लेफ्ट  आउट म्हणून विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. त्यात 94 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. प्रशासनातील सर्व यंत्रणा गावागावापर्यंत लसीकरणासाठी पोहोचल्या होत्या.

जिल्ह्यात 77 रूग्ण पॉझिटिव्ह असून 333 सक्रिय रुग्ण आहेत. तिसऱ्या कोरोना लाटेला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणावर बाधित संख्या वाढत आहे. जिल्ह्यामध्ये सध्या फ्रन्टलाइन वर्कर व ज्येष्ठ नागरिकांना तिसरी वर्धक मात्रा देण्यात येत आहे. जिल्ह्यात 4000 हून अधिक नागरिकांना तिसरा म्हणजे बुस्टरडोस देण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

रस्त्यावरील सर्व्हिसिंग सेंटर व्यवसायांवर सक्तीने कारवाई करा

Fri Jan 14 , 2022
-महापौर दयाशंकर तिवारी यांचे पोलीस वाहतूक विभागाला निर्देश  नागपूर : नागपूर शहरातील चिटणीस पार्क ते अग्रसेन चौक तसेच सेवासदन चौक ते गीतांजली चौक या रोडवर अनेक व्यावसायिक जुन्या वाहनांचा व्यवसाय करतात. हे व्यावसायिक विक्रीसाठी ठेवण्यात आलेले वाहन मनमानी पद्धतीने रस्त्यावर पार्क करतात. त्यामुळे येथील इतर वाहतुकदारांना त्रास सहन करावा लागत असून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. यामुळे अपघात सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहतुकीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com