मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत शहरातील चार लाखावर अर्ज मंजूर

– प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळवून देण्यासाठी महत्वाचा पुढाकार

नागपूर :- राज्य शासनाची महत्वाकांक्षी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या” अर्ज स्वीकृती बाबत नागपूर महानगरपालिकेने एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. शहरातील प्रत्येक लाभार्थी महिलेला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वात महत्वाचा पुढाकार घेण्यात आला. त्याचा फायदा देखील मिळाला आहे. नागपूर शहरातील चार लाखावर महिलांचे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेकरिता अर्ज मंजूर झालेले आहेत.

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे २.५ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या परिवारातील महिलांना प्रतिमाह १५०० रुपये आर्थिक सहकार्य दिले जात आहे.

नागपूर शहरातील अधिकाधिक महिलांना योजनेचा लाभ मिळावा, त्यांच्या अर्जाची योग्य तपासणी व्हावी याकरिता नागपूर महानगरपालिकेने विशेष पुढाकार घेतला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात मनपा मार्फत सदर योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याकरिता राज्य सरकारकडून ‍नियमित आवाहन करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद देत महिलांनी मोठ्या संख्येत या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज मनपाचे झोनल कार्यालय तसेच प्रभाग स्तरावरील जमा केले आहे. अर्ज स्वीकार करून त्याची योग्य तपासणी करून हे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी वर्ग करण्यात आले आहेत.

मनपाकडे ४ लाख ३३ हजार 570 प्राप्त अर्जांमधून ४ लाख 18 हजार 606 जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत मंजूरी प्राप्त झाली आहेत. यामध्ये नारी शक्ती दूत ॲपवर २ लाख २१ हजार 973 अर्ज प्राप्त झाले त्यापैकी २ लाख 20 हजार 251 अर्जांना मंजुरी मिळाली. तर माझी लाडकी बहीण पोर्टलवर २ लाख 11 हजार 597 अर्ज प्राप्त झाले त्यापैकी 1 लाख 98 हजार 355 अर्ज मंजूर झाले.

आधार कार्ड बँकेशी संलग्न करा

महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँके खात्याशी संलग्न करावे असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी केले आहे. लाभार्थ्यांनी बँकेला प्रत्यक्ष भेट देऊन आधार कार्ड बँक खात्यासोबत संलग्न करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत लाभार्थ्यांच्या भ्रमणध्वनीवर मॅसेज आणि व्हॉईस मॅसेज करण्यात येत आहेत.तसेच सर्व बँक आणि शाखेला लाभार्थ्यांचे आधार बँक खात्यासोबत संलग्न करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

योजनेसाठी आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) ते नसल्यास महिलेचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (Leaving Certificate) किंवा जन्म दाखला (Birth certificate) किंवा मतदार ओळखपत्र (Voter ID Card), परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर पतीचा जन्म दाखला किंवा पतीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) यापैकी कुठलेही एक कागदपत्र सादर करावे. याशिवाय उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न २.५ लाखापर्यंत) नसल्यास पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. (आधार कार्ड सोबत लिंक असावे.) हमीपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

विशेष म्हणजे, श्रावणबाळ,संजय गांधी निराधार तसेच इतर शासकीय आर्थिक योजना ज्या योजने-अंतर्गत रु. १५०० लाभ प्राप्त महिला सदर योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असणार आहेत तर त्याची नोंद महिलांनी घ्यावी.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आपली बस चालकांच्या "डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग" प्रशिक्षण वर्गाला सुरुवात

Fri Aug 30 , 2024
– आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन नागपूर :- नागपूर महानगरपालिका परिवहन विभाग आणि जनआक्रोश यांच्या संयुक्त विद्यमाने आपली बस चालकांसाठी आयोजित “डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग” याविषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन गुरुवारी (ता:२९) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. धरमपेठ येथील ट्राफिक चिल्ड्रनस पार्क येथे आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!