संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- ‘सद्रक्षणाय खलनिग्रहनाय’ या ब्रीद वाक्यानुसार परिसरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची मुख्य जवाबदारी ही पोलिसांवर असते तेव्हा 19 एप्रिल ला होऊ घातलेली लोकसभा निवडणूक , मुस्लिम बांधवांचा सण असलेल्या रमजान ईद ,14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान अचानक एखादी मोठी अनुचित घटना घडून कायदा व सुव्यस्थाचा प्रश्न निर्माण झाल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासन किती कटिबद्ध राहू शकते याची परीक्षण चाचणी म्हणून आज 19 मार्च ला सायंकाळी 5 दरम्यान नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करणाऱ्या आंदोलनकारांना पांगविण्यासाठी पोलीस प्रशासन गांभीर्याने किती वेळेत योग्य ती भूमिका घेऊ शकते यासाठी पोलिसांची घेण्यात आलेली रिहर्सल, मॉक ड्रिल यशस्वी पार पडली.
स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानात काही नागरिक तणावपूर्ण वातावरण निर्माण करून मैदानातील अतिक्रमण हटाव चे नारेबाजी करून जाळपोळ करण्यासह पोलीस प्रशासन विरोधात रोष दर्शवित असल्याचो गुप्त माहिती पोलिसांच्या गुप्त विभागाला मिळताच पोलिसानी त्वरित घटनास्थळी पोहोचून आंदोलनकाऱ्यांची चित्रफीती कॅमेऱ्यात कैद करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहितो देण्यात आली याप्रसंगी बघ्यांची एकच गर्दी जमली असून दोन्ही बाजूची वाहतूक ही बंद करण्यात आली होतो तर बऱ्याच वेळे नंतर एकीकडे आंदोलना ला तेज गती मिळत असल्याचे दृश्य निर्माण होताच त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे,जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले व थोड्याच वेळात पारडी पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी , कर्मचारी सुद्धा पोहोचले यांनी तणावपूर्ण स्थिती नोयंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस दलाच्या साहाय्याने आंदोलन काऱ्यांशी संवाद साधल्या नंतर आंदोलनकारि समजण्याच्या पलीकडे जाऊन प्रशासन विरोधात नारेबाजी करीत पोलिसांना आव्हान देत असल्याने त्यांना चोख प्रतिउत्तर देत सौम्य लाठीचार्ज चा देखावा करताच आंदोलन काऱ्यानी एकच पळ सोडला दरम्यान जवळपास दोन जणांना तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेण्यात आले. तसेच जख्मि सदृश दोघांना एमबुलेन्स मध्ये पाचारण करावे लागले तर अग्निशमन वाहनांच्या सहाय्याने झालेली टायरची जाळपोळ तसेच दगडफेक झालेले विटांचे तुकडे साफ करण्यात आले. याप्रकारे पोलीसांच्या वतीने घेण्यात येणारी मॉक ड्रिल यशस्वी ठरली. तदनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे व जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या नेतृत्वात उपस्थित पोलीस पथकासह कामगार नगर, रमानगर, बुद्धनगर, जयभीम चौक मार्गे रुटमार्च करून नागरिकांशी संवाद साधून कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान करण्यात आले.