संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी होऊन आपला व आपल्या शाळेचे नावलौकिक करण्याचे आव्हान माजी आमदार देवराव रडके यांनी सरस्वती उच्च प्राथमिक शाळेत आयोजित क्रीडा व सांस्कृतिक म्होसत्वच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन ग्रामीण उद्धार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार देवराव रडके यांचे हस्ते दीप प्रजवलन व सरस्वती ,संस्था संस्थापक स्वर्गीय संतोषराव रडके भाऊ स्व धर्मराज रडके यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष शेषमल ओसवाल, सचिव डॉ विजय रडके, ललित रडके ,सुवासिनी रडके, सुषमा राखडे,पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर ,मुख्याध्यापिका विजया गोतमारे, शंकर भुजाडे, कृष्ण बोडतकर ,भक्तराज हारगुडे उपस्थित होते क्रीडा स्पर्धेत कबड्डी ,खो-खो, धावणे सह एकल व समूह नृत्य, गीत गायन ,भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयपाल बारसागडे यांनी केले व संचालन तुषार सहारे यांनी केले व आभार प्रदर्शन रजनी पडोळे यांनी मांनले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी तुषार शहारे, ज्योती भुजाडे, रजनी पडोळे, नमित समुड्रे, हेमंत डोंगरे ,मालती रेवतकर ,ज्योत्सना ज्ञानवटकर, निकिता साखरे ,नेहा वांढरे ,राजू डोके, लता गाढवे ,रेखा खरकाटे, कल्पना नागमोते ,ममता काटकर आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते.