संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
नागपुर :- श्रीलंका येथील जनाउदानगम या शहरातील बोधिरूख्खारामय बुद्धिष्ट टेम्पल येथे डॉ बि आर आबेडकर बुद्धिष्ट धम्म स्कूल चे लोकार्पण आज श्रीलंकेतील बौद्ध परंपरानुसार संपन्न झाले.
मुळ श्रीलंकेतील पण डॉ भदंन्त सावंगी मेधंनकर महास्थविर यांचे शिस्य सारनाथ येथे उपसंम्पदा ग्रहण केलेले भदंन्त उनपान अर्यधम्म महास्थविर यांच्या अथक परिश्रमातुन उपरोक्त शाळेची निमित्ती झाली असुन भारत श्रीलंका फ्रेंडशिप असोसिएशन चे संस्थापक समन्वयक आहेत.
उपरोक्त असोसिएशन चे भारतीय प्रतिनिधि मंडळात समन्वयक म्हणुन भदंन्त संघरत्न मानके,भदंन्त सिवनी बोधानंद महास्थविर भदंन्त नाग दिपंकर महास्थविर,डाॅ भदंन्त सीलवंस महास्थविर ,भदंन्त प्रज्ञाज्योती महास्थविर व एडवोकेट सुलेखा कुंभारे यांचा समावेश असुन शाळा व्यवस्थापनात याचा सहभाग राहणार असुन मागील अनेक वर्षापासुन श्रीलंका येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रथालय निर्माण करण्या सह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध धम्म विषयक साहित्य सिहली भाषेत प्रसारित करण्याचा आहे लवकरच त्या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे भदंन्त नाग दिपंकर महास्थविर यांनी व्यक्त केले.