संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – परिसरात आलेल्या जोरदार पावसाने राय नगर कन्हान येथील श्री मुकुंदराव मुळे यांचे घराची भिंत रविवार ला रात्री पडुन घरातील सामानाची व बाजुच्या श्री घटोत्कच ऊके यांचे घराच्या भिंतीवर पडल्याने त्यांचे ही नुकसान झाले.
जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यात पावसाळयातील सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला. आणि सप्टेंबर लागताच रविवार (दि.४) सप्टेंबर २०२२ ला सकाळी ७ ते १२ वाजे पर्यंत कन्हान व परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसाळयातील जोरदार पाऊस व रविवारच्या पावसामु़ळे रविवार ला रात्री १०.३० वाज ता दरम्यान रायनगर कन्हान येथील मुकुंदराव मुळे यांचे घराची भिंत बाजुच्या गल्लीत पडुन भयंकर नुक सान झाले. तसेच शेजारी घटोत्कच ऊके यांचे घराच्या भिंतीवर पडल्याने त्यांचे ही नुकसान झाले आहे. घरातील लोक सर्व जागे असल्याने या नैसर्गिक आपत्तीत सुदैवाने कुठलेही जिवहानी झाली नाही. परंतु खाद्य सामुग्री, सामान, कवेलु, फाटे असे एकुण एक लाखाच्या जवळपास नुकसान झाल्याने दुरूस्ती करिता शासना कडुन नुकसान भरपाई देण्याची नगरवासी यानी मागणी केली आहे.