कोदामेंढी :- नांदगाव येथील हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कोदामेंढीतील विद्युत पुरवठा 24 तास सुरू असतो, क्वचितच नैसर्गिक रित्या हवामान बिघडल्यास, जोराचा वादळ वारा आल्यास किंवा आकाशातून विजा कडाडल्यास तात्पुरता बंद होतो व लगेच दुरुस्त करून अविरत 24 तास वीज पुरवठा सुरू असतो. अन्न ,वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा असून आजच्या या डिजिटल युगात मूलभूत गरजेत विजेचाही समावेश झालेला आहे. त्यामुळे विजे शिवाय कोणतेही काम होत नाही. मात्र नांदगाव येथे विजेच्या वारंवार लपंडा होत असल्याने दुकानदार व नागरिक त्रस्त असून नांदगाव येथील ग्राहक वर्ग म्हणजेच नांदगावची ग्राहकगंगा ही हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कोदामेंढी येथील दुकानातून जाऊन त्यांचे सामान खरेदी करीत असतात व इतरही कामे करण्यासाठी जात असतात. त्यामुळे नांदगाव येथील दुकानदाराचे आर्थिक नुकसान होत असते, असे नांदगाव येथील दुकानदारांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे संबंधित वीज वितरण विभागाने येथील विद्युत पुरवठा 24 तास अविरत सुरू ठेवावा, अशी मागणी नांदगाव येथील दुकानदार वर्ग व त्रस्त नागरिकांनी केली आहे.