कामठी तालुक्यात शुद्ध पाण्याच्या नावावर जनतेची सर्रास फसवणूक.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 4 :- कामठी तालुक्यात पावसाळा संपन्याच्या मार्गावर असून सर्वत्र शुद्ध पाणी पिण्याची सवय झाली आहे. तर बाजारपेठेत सह इतरत्र नागरिकांना पिण्याच्या थंडा पाण्याचा गोडवा लागतो.त्यातच नागरिकांना आरो तसेच फिल्टर केलेल्या पाणी पिण्याची क्रेझ वाढली आहे याचीच संधी साधून शुद्ध पाण्याच्या नावाखाली तालुक्यात जनतेची सर्रास फसवण्याचे काम विविध ऍकवा कंपनीच्या नावावर सुरू करण्यात आलेल्या फिल्टर प्लांटच्या संचालका कडून करण्यात येत आहे तर उलट यकडे येथील नगर परिषद प्रशासनासह संबंधित विभाग बघ्याची भूमिका घेत आहे.

कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात अनेकांनी पाण्याच्या फिल्टर प्लान्ट चा व्यवसाय सुरू केला आहे.सदर फिल्टर प्लांट च्या संचालकाकडून शुद्ध पाण्याच्या नावावर ग्राहकाकडून वारेमाप पैसे उखळण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.नागरिकांमध्ये आरो तसेच फिल्टर केलेल्या पाणी पिण्याची क्रेझ वाढली असल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा शुद्ध पाणी म्हणून दैनंदिन फिल्टर प्लांटच्या संचालका कडून पाण्याच्या कॅन विकत घेताना दिसून येतात मात्र त्या एकवा च्या नावावर विक्री करीत असलेले फिलटर चे पाणी किती शुद्ध, अशुद्ध आहे याची खातरजमा कुणीही करताना दिसून येत नाही.फिलटर पाण्याच्या नावावर फक्त पाणी थंड करून विकण्याचा गोरख धंदा अनेकांनी सुरू केलेला असून अनेकांकडे अशा प्रकारे कित्येकांनी शासनाची परवानगी न घेता फिल्टर प्लांट सुरू केल्याची माहिती आहे शिवाय फिल्टर प्लांट मधून ब्यालर भरून विक्री करण्यात येणारे पाणी किती प्रमाणात शुद्ध आहे याची खातरजमा करण्यासाठी सुदधा कामठी नगर परिषद चा पाणी पुरवठा अधिकारी सह संबंधित अधिकारी प्लांट कडे भटकत नसल्याने फिल्टर प्लांट च्या संचालकांचा गोरखधंदा जोमात राजरोसपणे सुरू आहे.फिलटर प्लांट च्या संचालका कडून पाण्याच्या एका कॅन साठी 20 ते 40 रुपये वसुली करतात तर शुद्ध पाण्याच्या नावाखाली पाण्याच्या गोरखधंदा जोमात सुरू आहे मात्र संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना या फिल्टर प्लांट च्या संचालकाकडून मिळत असलेल्या चिरीमिरी मुळे ”तेरी भी चूप मेरी भी चूप”असा प्रकार सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पोलिसांच्या आशीर्वादाने कामठीत गांजा विक्री जोमात..

Sun Sep 4 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 04 – नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहराची 1990 -92 मध्ये झालेल्या जातीय दंगलामुळे महाराष्टाच्या गॅझेट मध्ये राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे अतिसंवेदनशील शहर म्हणून नोंद कारण्यात आली आहे तेव्हा कामठी शहरात गुन्हेगारीवर अंकुश लादून कायद्याचे राज्य निर्माण व्हावे या मुख्य उद्देशातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडंणविस यांच्या शुभ हस्ते कामठी पोलीस स्टेशन नागपूर परिमंडळच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!