संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 2:- काल 1 मे ला महाराष्ट्र दिनी स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव अंतर्गत महापांचायातराज अभियान . 01 मे 2022 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत राबविण्यात येणाऱ्या अभियानाची सुरुवात कामठी पंचायत समिती कार्यालयातून करण्यात आली.
सदर कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी पंचायत समितीचे सभापती. उमेश रडके, प्रमुख उपस्थिती गट विकास अधिकारी अंशुजा गराटे,,सहाय्यक गट विकास अधिकारी प्रदीप गायगोले, पंचायत समिती सदस्य सोनु कुथे, पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात अभियानात विविध उपक्रम राबविले जाणार आहे त्याची चर्चा करण्यात आली. व वाचन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक गट विकास अधिकारी यांनी केले. तसेच योजनांची सविस्तर माहिती समाजकल्यान कार्यालयाच्या सुनीता गेडाम यांनी दिली.