कामठी तालुक्यात गणरायाचे विसर्जन थाटात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– गणपती बाप्पा मोरया….पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात गणरायाचे विसर्जन

कामठी :- दहा दिवसीय गणेशोत्सवाच्या अनंत चतुर्दशी पर्वावर गणरायाचे कामठी तालुक्यात ठिकठिकानी गणपती बाप्पा मोरया ….पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात थाटात विसर्जन करण्यात आले.

मंगलमय वातारणात श्री गणेशाचे भक्ती भावाने भजन, पूजन,आराधना, व आदरातिथ्य केल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप देत महादेव घाट येथे विसर्जन करण्यात आले. यावेळी विसर्जन दरम्यान कुठलीही अनुचीत घटना न घडावी यासाठी प्रशासनाच्या पूर्वनियोजित नुसार ढिवर समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विसर्जन सोय करण्यात आल्याने गणरायाचे सोयीस्कर विसर्जन करण्यात आले.

तसेच नदी प्रदूषित होणार नाही याची दक्षता घेत नगर परिषद कामठी,लायन्स क्लब कामठीच्या वतीने निर्माल्य व्यवस्थापन साठी महादेव घाटावर ठिकठिकानी निर्माल्य साधने व निर्माल्य संकलन कुंडी ठेवल्याने नागरिकांनी निर्माल्य तिथे संकलित करीत त्वरित स्वच्छता करण्यात आली. तसेच विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळाच्या स्वागतासाठी जुनी कामठी पोलीस स्टेशन समोर नेतेमंडळी नि मोठं मोठे स्वागत मंच तयार केले होते यानुसार महायुती व महाविकास आघाडी अशा विविध पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले गणेश विसर्जन तसेच मिरवणूक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडावे यासाठी डीसीपी निकेतन कदम,एसीपी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे , पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यानि ठिकठिकानी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवीत प्रत्येक हालचालीवर पोलिसांनी नियंत्रण साधले होते..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांच्या मौखिक आश्वासनानंतर येरखेड्यातील 28 दिवसीय साखळी उपोषणाची सांगता

Thu Sep 19 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – येरखेडा ग्रामपंचायत ला नगर पंचायत चा दर्जा मिळवून देण्यासाठी 28 दिवसापासून पुकारले होते ‘आरसा दाखवा आंदोलन’ कामठी :- नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या येरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत लोकसंख्या ही अंदाजे30 ते 35 हजाराच्या घरात असून सन 2011 च्या जनगणनेनुसार 15 हजार 727 इतकी लोकसंख्या आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या अयोग्य नियोजनामुळे येरखेड्यात विविध मूलभूत समस्यांचा डोंगर साचला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com