जुनीकामठी शिव मंदिरात महाशिवरात्री महोत्सव थाटात साजरा

” हर हर महादेव”, ” बंम बंम भोले” च्या जयघोषात पुजा , अर्चना संपन्न. 
 
कन्हान : – शहरात व परिसरात महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो परंतु मागील दोन वर्षा पासुन कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने नाग रिकांनी घरीच पुजा अर्चना केली होती. परंतु या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने शासनाचे निर्बंध शिथील असल्याने जुनीकामठी पुरातन शिव मंदीरात सकाळ पासुन नागरिकांनी पुजा अर्चना व विविध कार्यक्रमाने महाशिवरात्री महोत्सव उत्साहाने थाटात साजरा कर ण्यात आला.
          मंगळवार (दि.१) मार्च २०२२ ला महाशिवरात्री महोत्सव जुनीकामठी शिव मंदीरात सकाळी ४ वाजता विशेष यजमानांच्या हस्ते कामठेश्वर शिवालयाचे विद्वा न पंडित च्या हस्ते अभिषेक व सामुहिक आरती ने कार्यक्रमाची सुरूवात करित भजन कीर्तन कार्यक्रम करण्यात आला. महाशिवरात्री निमित्य परिसरातील नागरिकांनी जुनीकामठी कामठेश्वर मंदिरात शिव पिंड वर दुध, दही चा अभिषेक करून बेलबत्ती, पुष्प वाहुन पुजा अर्चना केली. गाडेघाट जुनीकामठी रोडवर कन्हा न-पिपरी दुर्गा माता मंदीर मित्र परिवार द्वारे महाशिव रात्री निमित्य नागरिकांना साबुदाना व फळ वाटप करण्यात आले. परिसरातील छोट्या मोठ्या शिव मंदिरात महाशिवरात्री निमित्य भजन कीर्तन व विविध कार्यक्रमाने महाशिवरात्री महोत्सव उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महाशिवरात्रीके पावनपर्वपर भक्तोकी उमडी भीड 

Tue Mar 1 , 2022
काटोल संवाददाता :- भगवान शिव पार्वती का विवाह जिस दिन हुआ था उस दिनको महाशिवरात्री कहा जाता है महाशिवरात्री का त्यौहार पुरे भारतवर्षमे बडे धुमधामसे मनाया जाता है इसदिन भक्तगण भगवान शिवशंकर के मंदिरोमे जाकर बडे श्रद्धासे दर्शन करते है काटोल शहर के मध्यवर्ती स्थानपर ऐतिहासिक और पुरातन महादेव मंदिर मे सुबह 4 बजेसे भक्तोका दर्शनहेतू बडी संख्या मे आवागमन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!