गोंदियात नाल्याला आलेल्या पूराच्या पाण्यात तीन युवक वाहून गेले…

अमरदिप बडगे , प्रतिनिधी 

एकाला वाचविण्यात यश तर दोघांचा बचाव पथकाकडून शोध सुरू

गोंदिया  – जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर गोंदिया ताक्यातील तुमखेडा खुर्द येथील तीन युवक लोधीटोला येथील नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेले असता, त्यांचा तोल गेल्याने तीन युवक नाल्याला आलेल्या पूराच्या पाण्यात वाहून गेले.

तीन युवकांपैकी एका युवकाला वाचविण्यात यश आले असून दोघांचा शोध सुरू आहे. पूरात वाहून गेलेल्या युवकांचे नाव आशिष बागळे 24 वर्ष व संजू बागळे 27 वर्ष असे आहेत हे दोघेही भाऊ आहेत. सागर परतेगी 28 वर्ष याला वाचविण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी तालुक्यात पावसाचा हाहाकार

Wed Jul 13 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -कन्हान नदीला आलेल्या महापुराने कामठी तालुक्यातील ग्रामीण भागातील गावाना पुराणे वेढण्याची शक्यता -एकाच दिवसात कामठी तालुक्यात सरासरी 73.04 मी मी पावसाची नोंद -भामेवाडां ग्रा प महिला सरपंचचे घर कोसळले कामठी ता प्र 13:-मागील पाच दिवसापासून सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व काल पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेंच प्रकल्पातील पाण्याचा वेढा वाढल्याने नाईलाजास्तव पेंचचे दरवाजे उघडण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com