पर्यावरण मंत्री-आदित्य ठाकरेंनी आशांच्या शिष्टमंडळास भेटण्यास नकार
नागपुर – निवासी जिल्हाधिकारी -विजया बनकर यांना निवेदन सादर केले. शिष्टमंडळात राजेंद्र साठे,प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर, अंजू चोपडे, कांचन बोरकर उपस्थित होते. आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू) तर्फे राज्य स्तरावर आशा व गटप्रवर्तक विविध मागण्यांना घेऊन एक दिवसाच्या संप करून संविधान चौकात शेकडो आशा-गट प्रवर्तक यांनी लाटणे आंदोलन केले. मार्च २०२० पासून कोरोनाचा भारतात प्रवेश झालेला आहे. त्या कालावधी पासून कोरोणाला हद्दपार करण्याकरता आशा वर्कर सतत झटत आहेत. केंद्र सरकार असो की राज्य सरकार कोणीही काम करून सुद्धा मोबदला दिलेला नाही परंतु दवाब बनवून आशा वर्कर कडून काम करून घेतले जाते राज्य शासनातर्फे जुलै २०२०आशा वर्कर्स करता २००० व गट प्रवर्तक करता ३००० रू. सुद्धा सप्टेंबर २०२१ पासून पासून कोणताही निधी मिळालेला नाही. जुलै २०२१ पासून आशा वर्कर्स ला १५०० व गट प्रवर्तक यांना १७०० रू. लागू करण्यात आले परंतु तो पन निधी मिळालेला नाही. केंद्र शासनाने आज पर्यंत कोणताही निधी दिलेला नाही
(१) आशा व गटप्रवर्तक यांना कर्मचाऱ्यांच्या दर्ग्यात येऊन किमान समान वेतन देण्यात यावे
(२) हर घर दस्तक व कवच कुंडल सर्व्हेचे काम करून मोबदला देण्यात आलेला नाही तो देण्यात यावा
(३) एक्सपायरी डेट जवळ आल्यानंतर औषध वाटप जिम्मेदारी आशाला देण्यात येतं ते काम आधीच देण्यात यावे
(४) आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना दोन हजार वीस पासून शासनातर्फे कोणतीही स्टेशनरी देण्यात आलेली नाही त्याच्या निधी कुठे गेला याची चौकशी करण्यात यावी
(५) आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना दर महिन्यात वेळेवर मानधन देण्यात यावे त्याचबरोबर इतर मोबदला सुद्धा वेळेवर देण्यात यावा.
वरील मागण्यांना घेऊन ClTU तर्फे राज्य स्तरावर लाटणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर, रुपलता बोंबले, अंजू चोपडे, लक्ष्मी कोट्टेजवार, माया कावळे, कांचन बोरकर, अर्चना कोल्हे यांनी केले.