गडचिरोली :- 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा क्षेत्रातील निवडणूका दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पाडणार आहेत. त्यानुषंगाने, आरमोरी – 67 विधानसभा क्षेत्रातील एकुण 310 बुथवर निवडणुक प्रकिया पार पाडणार आहे. त्याकरीता दिनांक 18/11/2024 रोजी 39 बुध निहाय पथक हेलीकॅप्टरव्दारे व 91 पथक बस आणि इतर वाहनाने आपले शासकिय कर्तव्य पार पाडण्याकरीता रवाना झालेली आहेत. मतदान कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याकरीता व त्यांना प्रोत्साहन देण्याकरीता निवडणूक निरीक्षक विनीतकुमार (भा.प्र.से.) व निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी मानसी, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी कुरखेडा हे देसाईगंजच्या तालुका क्रिडांगण येथील हेलीपॅडवर हजर होते.
यावेळी क्षेत्रिय अधिकारी व मतदान अधिकारी यांचे गुलाबपुष्प देवुन स्वागत करण्यात आले. मतदान अधिकारी हे खुप उत्साही होते व त्यांनी या आधीचे निवडणुकीचे अनुभवसुध्दा व्यक्त केले. प्रत्येक नागरीकाने सहभाग दर्शवून संपुर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पाडण्याकरीता सहकार्य करावे. असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी मानसी यांनी केले आहे.