नागपूर :– ‘वीज तेथे शेती आणि शेती तेथे प्रगती’ या सहज आणि सोप्या समिकरणावर काम करीत महावितरणच्या नागपुर परिमंडलाने एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 या 17 महिन्याच्या काळात नागपूर आणि वर्धा जिल्हातील तब्बल 10 हजार 573 कृषीपंपांना वीज जोडणी दिली आहे.या वीज जोडण्या कृषी वीज धोरण 2020, डीडीएफ़, नॉन डीडीएफ आणि जिल्हा नियोजन निधीतून देण्यात आल्याची माहिती नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली आहे.
यात आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये नागपूर जिल्ह्यात 4 हजार 331आणि वर्धा जिल्ह्यात 3 हजार 866 अश्या नागपूर परिमंडलात एकूण 8197 तर आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या पाच महिन्यात नागपूर जिल्ह्यातील 1 हजार 303 आणि वर्धा जिल्ह्यातील 1 हजार 73 आशा एकूण 2 हजार 376 कृषीपंपांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. 10 हजार 573 कृषीपंपांपैकी सर्वाधिक 9 हजार 405 वीज जोडण्या या कृषी वीज धोरण – 2020 योजनेअंतर्गत देण्यात आल्या आहेत.
कृषीपंपांना वीज जोडणी देतांनाच शेतीला शाश्वत वीजपुरवठा मिळावा यासाठी कृषी वीज धोरण – 2020 योजनेअंतर्गत कृषी पंपाकरिता पायाभूत सुविधा उभारणी करण्यात येत असून यात उपकेंद्रापासून 5 किमीच्या हद्दीत मिनी सोलर पार्क उभारण्याला व दुर्गम, डोंगराळ किंवा आदीवासी भागामध्ये कमी विद्युत दाबाच्या समस्या निवारण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणी, कृषी प्रवण उपकेंद्रामध्ये स्वयंचलित कॅपेसिटर बँक कार्यान्वित करणे, कृषी वाहिन्यांवर योग्य क्षमतेचे कॅपेसिटर बसविण्याची कामे देखील प्रगतीपथावर असल्याची माहिती दोडके यांनी दिली
कृषी वीज धोरण – 2020 योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कृषीपंप ग्राहकाने वीजबिल थकबाकीचा भरणा केल्यास त्यातील मोठी रक्कम त्यांच्या गावासाठी व जिल्ह्यातील पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी वापरली जात असल्याने कृषीपंपाच्या नियमित वीजबिलासोबतच थकबाकीचा देखील भरणा करण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केलेआहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण नागपूर