शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा

– आमदार सुधाकर अडबाले यांची शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मागणी

नागपूर :- जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाने दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी शासन निर्णय काढला. यावर शालेय शिक्षण विभागाने स्‍वतंत्र शासन निर्णय न काढल्याने शिक्षक – कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना असल्याने तात्काळ शालेय शिक्षण विभागाने स्‍वतंत्र शासन निर्णय काढून शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची आमदार सुधाकर अडबाले यांनी भेट घेतली. यावेळी आयुक्त (शिक्षण) सचिंद्र प्रताप सिंह उपस्थित होते.

दि. ०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्‍या प्रकरणी शासन सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्‍यानंतर रूजू झालेल्‍या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे. परंतु, जिल्हा परिषद / खासगी अनुदानित / अंशतः अनुदानित शाळेत कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णय लागू झालेला नाही. त्यामुळे वित्त विभागाने दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी काढलेल्‍या दि. ०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्‍या प्रकरणी शासन सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्‍यानंतर रूजू झालेल्‍या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा शालेय शिक्षण विभागाने स्‍वतंत्र शासन निर्णय काढण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन दिले.

तसेच नगर परिषद भंडारा येथील बऱ्याच वर्षांपासून संच मान्यता दुरुस्ती प्रकरण व विदर्भातील ज्या संच मान्यता दुरुस्ती प्रकरणे प्रलंबित आहेत, त्या तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी आयुक्त (शिक्षण) सचिंद्र प्रताप सिंह यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महाकाली यात्रेसाठी मनपा प्रशासनाची तयारी सुरु

Thu Mar 20 , 2025
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात “देवी महाकाली” यात्रेस 3 एप्रिलपासून सुरवात होत आहे. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेची राज्यभरातील भाविक आतूरतेने वाट पाहत असतात. राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेच्या दृष्टीने चंद्रपूर मनपा प्रशासनद्वारे तयारी करण्यात येत आहे. महानगरपालिका प्रशासनातर्फ़े यात्रा मैदानाला व्यवस्थेच्या दृष्टीने विविध भागात विभाजित करण्यात येत आहे.यात्रा मैदानात जाण्यास अतिरीक्त रस्ते तयार करण्याचे काम प्रस्तावित असुन झरपट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!