खनिज क्षेत्रातील कामांवर देखरेख करणारी अद्ययावत यंत्रणा कार्यरत करा – खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई

मुंबई :- खनिकर्म विभागाने केंद्र व राज्यातील नियमावलींचा अभ्यास करून सर्व खनिजक्षेत्राचे प्रभावी नियंत्रण करावे. खनिज क्षेत्रातील सुरू असलेल्या कामांवर अत्याधुनिक यंत्रणेमार्फत देखरेख करण्याचे निर्देश खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली खनिकर्म विभागाची आढावा बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीस खनिकर्म विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, व्यवस्थापकीय संचालक डॉ.भाऊसाहेब दांगडे, विभागाचे उपमहाव्यवस्थापक डॉ. राव, खनिकर्म विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, तसेच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, खनिकर्म विभाग, राज्य खनिकर्म महामंडळ तसेच खनिकर्म विभागांतर्गत हाताळण्यात येणारे विषय केंद्र व राज्याचे विषय याबाबतीत समन्वय असावा. केंद्र शासनांच्या नियमांसोबत राज्य शासनही याबाबतीत धोरण ठरवेल. राज्यातील खनिजनिहाय खाणपट्टया, यामध्ये एकूण खनिपट्टे, सुरू असलेले खाणपट्टे, बंद असलेले खाणपट्टे,स्वामित्वधन संकलनाचा तपशील याबाबत योग्य कार्यवाही विभागाने करावी. जास्तीत जास्त खाणपट्टी लिलावास काढण्यासाठी राज्यांमध्ये अन्वेषण वाढविणे, एकात्मिक खाणपट्टा व्यवस्थापन संगणकीय प्रणाली २.० लागू करणे, महाजेनको- एमएसएमसी- कोल वॉशरी यांच्या कामामध्ये सुसूत्रता आणणे, महसूल वाढीच्या दृष्टीने २०१५ च्या अधिसूचनेनुसार घोषित गौण खनिजांचे पुनर्वर्गीकरण करून त्यांचे संनियंत्रण खनिकर्म विभागाकडे घेणे याबाबतीतही कार्यवाही करण्यात यावी. एखाद्या खाणीच्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण अभ्यास पर्यटन क्षेत्र विकसित करता येईल का याबाबत सर्वेक्षण करावे व त्याचा अहवाल सादर करावा, अशाही सूचना देसाई यांनी केल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

‘म्हाडा’च्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे एक लाख घरे उभारणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Thu Jan 30 , 2025
– म्हाडा पुणे मंडळातर्फे ३६६२ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात मुंबई :- सर्वसामान्य नागरिकांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध असून येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून राज्यात सुमारे एक लाख घरांच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. सदर उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण देखील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. पुणे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!