नागपूर : – येथील संविधान चौक येथे हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी संघटनांच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात त्या बोलत होत्या. मुंबईतील हिंदू तरुणी ‘श्रद्धा वालकर’ हीचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव्ह-जिहादी आफताब पुनावाला उत्तर प्रदेशातील लखनऊ येथेही 19 वर्षीय ‘निधी’ या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्दयीपणे हत्या करणारा सुफीयान. या केवळ एक-दोन घटना नसून अशी अनेक उदाहरणे यापूर्वीही समोर आलेली आहेत. लव जिहादच्या भयंकर षडयंत्राला हिंदू तरुणी राजरोस बळी पाडत आहेत. त्यामुळे हे थांबिण्यासाठी कठोर अशा लव जिहाद विरोधी कायद्याची आवश्यकता आहे आणि असा कायदा तत्काळ लागू करून या नराधमाना फाशी देण्यात यावी असेही त्या यावेळी म्हणाल्या.
या आंदोलनात विविध हिंदु संघटनांनी सहभाग घेतला. या वेळी ‘आता अबला नको तू सबला हो, चंडी, दुर्गा, काली हो !’, ‘लव्ह जिहादी नराधम आफताबला फाशी द्या !’, ‘लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा !’ अशा घोषणाही देण्यात आल्या. ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही या वेळी सांगितले.
यावेळी हिंदू जनजागृती समितीचे अतुल अर्वेन्ला यांनी राज्यातील चर्चप्रणीत अनाथालये, तसेच कोन्व्हेन्ट शाळेत अल्पवयीन मुला-मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. अल्पवयीन मुला-मुलींवर लैगिक आणि अन्य प्रकारचे अत्याचार करत असलेल्यांवर पॉस्को तसेच बाल हक्क संरक्षण कायदा 2005 नुसार गुन्हे नोंदवून कडक कारवाई करण्यात यावी असे प्रतिपादन केले. महाराष्ट्रातील सर्व कोन्व्हेंट शाळा आणि चर्चप्रणीत अनाथालयांमध्ये अत्याचार होत नाही ना, हे तपासण्याकरिता पत्रकार, समाजसेवक, पोलिस, महिला, निवृत्त न्यायाधीश आणि शासकीय अधिकारी यांचे एक ’विशेष तपासपथक’ नेमून शाळांची चौकशी करण्यात यावी, अशी आम्ही मागणी करत आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.
राष्ट्रीय युवा गठबंधन चे सभापती राहुल पांडे यांनी ‘लव’ नसून जिहादच्या नावाने ‘लव’ केले जात आहे व हिंदुना संघटीत होऊन याचा सामना करावा लागेल असे प्रतिपादन केले. हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत या धर्मांधांनी बघू नये अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असेही ते म्हणाले. यावेळी आनंद राठी (आर्ट ऑफ लिविंग), प्रदीप देशपांडे (योग वेदांत समिती), राजकुमार मिश्रा (राष्ट्रीय युवा गठबंधन), अशोक लिखिते (शिवसेना), संवर्धिनी न्यास संस्थेच्या डॉ. अभिलाषा घनोटे व डॉ. शुभांगी देशपांडे आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.