संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
• छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला माल्यार्पण करून केले अभिवादन
कामठी :- इतिहासाच्या पानावर तसेच मातीच्या कणावर व विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा जाणता राजा म्हणजे राजा छत्रपति शिवाजी महाराज, यांचे आदर्श आत्मसात करून देशाची वाटचाल करावी, असे आवाहन माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांनी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त केले.
छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपति शिवाजी महाराज चौक कामठी येथील छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला माजी राज्यमंत्री व बरिएमं च्या प्रमुख ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या शुभ हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले, या वेळी ॲड. सुलेखा कुंभारे यांनी सर्व उपस्थितांना छत्रपति शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देवून मार्गदर्शन केले.
या प्रसंगी छावणी परिषद चे माजी उपाध्यक्ष दिपक सिरीया, चंदु लांजेवार, बरिएमं अल्पसंख्याक चे प्रमुख अफजल अंसारी, दिपंकर गणविर, सुभाष सोमकुवर, नियाज कुरेशी, अनुभव पाटील, विनय बांबोर्डे, सागर भावे, राजेश शंभरकर, सुनिल वानखेडे, सचिन नेवारे, श्रीकांत डंभारे, अजित बागडे, रेखा भावे, सावला सिंगाड़े, रजनी गजभिये, अल्का तांबे, छाया बंसोड रेखा पाटील, उषा भावे, पल्लवी भावे, विमल लोणारे, सुमन घरडे, शालु सावतकर, वंदना आळे इत्यादी मोठ्या संख्येने बरिएमं चे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
या वेळी लायंस क्लब व्दारे आयोजित रक्तदान शिबीर ला ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी भेट दिली व लायंस क्लब चे पदाधिकारी अनिल देशमुख, आशिष वंजारी, तसेच आयोजकांचे अभिनंदन करून आभार मानले.