वैनगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत आक्षेप असल्यास सादर करा जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भंडारा :- वैनगंगा सहकारी साखर कारखाना येथील माजी कायमस्वरूपी अथवा हंगामी कामगार यापैकी कोणासही आक्षेप सादर करावयाचा असल्यास त्यांनी 15डिसेंबर 2023 पर्यत उपजिल्हाधिकारी महसुल यांचेकडे सादर करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी ,योगेश कुंभेजकर, यांनी केले आहे.

यासंबंधीची यादी भंडारा जिल्हा वेबसाईटवर प्रसीध्द करण्यात आली असून यादीतील कर्मचारी व त्यांचे कायदेशीर वारस यांनी बॅक खात्याचा तपशील,ओळखपत्र,रहीवासी प्रमाणपत्र तसेच मृत्यु कामगार यांचेबाबतीत वारसदारांनी वारस असल्याबाबत शपथपत्र व इतर पुरावे सादर करावे.

यासंबंधी मा.सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली व मा.औदयोगिक न्यायालय,भंडारा यांचेकडील वसुली प्रमाणपत्राचे आधारे संबंधित कामगाराचे तसेच मयत कामगार यांचे थकीत वेतन योग्य ती पडताळणी करून त्यांचे बॅक खात्यात जमा करण्याचे निर्देश दिलेले आहे.त्यामध्ये 7.5 टक्के व्याज आकारणी करून अदा करण्याच निर्देश आहेत.या कामी संबंधीत रक्कम अदा करणेसंबंधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली आहे.

नियमीत कामगार एकुण् 315 व हंगामी कामगार 326 असे एकुण 641 कामगाराचे थकीत वेतन व त्यावर 7.5 टक्के व्याज सोबतचे यादीप्रमाणे प्रारूप प्रसिध्द करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत बिटिंग रिट्रीट समारोह

Fri Dec 15 , 2023
मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. १४) भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’ समारोहाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, माजी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते. यावेळी नौदलातर्फे हेलिकॉप्टर्सचे फ्लाय पास्ट, नेव्हल सेंट्रल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!