होर्डिंग्ज लावणार असाल तर सावधान,मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अवमानाचा दाखल होऊ शकतो गुन्हा

– अनधिकृत होर्डींगवर सक्त कारवाईचे आयुक्तांचे निर्देश

– राजकीय पक्ष व प्रिंटर्सना केले अवगत

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील विना परवानगी होर्डिंग,बॅनर,जाहीरात फलक उभारणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले असुन अनधिकृत होर्डींगसाठी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत राजकीय पक्ष प्रतिनिधी व बॅनर छापणाऱ्या प्रिंटर्सना सोमवार ३१ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत मनपा प्रशासनाद्वारे अवगत करण्यात आले.

घाटकोपर येथील होर्डींग दुर्घटनेनंतर सुस्वराज फाऊंडेशनची दाखल जनहित याचिका क्र.१५५ / २०११ नुसार मा.उच्च न्यायालयाने शहरातील अनधिकृत होर्डींग,बॅनर, जाहीरात फलकांवर सक्त कारवाई निर्देश दिलेले आहेत.त्याअनुषंगाने पोलीस विभाग व मनपा प्रशासनाद्वारे मनपा क्षेत्रातील प्रिंटर्स व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यात आयुक्त यांनी संबंधितांना मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत अवगत केले व शहरात कुठलेही अवैध बॅनर,जाहीरात फलक,होर्डिंग लाऊ नये अन्यथा न्यायालयीन आदेशानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची कल्पना दिली.

अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर, फलक पालिका करणार जप्त असून गुन्हाही दाखल केला जाणार आहे. अनधिकृत होर्डिंग्ज तपासणीसाठी क्यूआर कोड देण्यात आला आहे. तो क्यूआर कोड नसेल तर कारवाई होणार आहे.त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे नागरिकांच्या सहभागासाठी वॉर्ड निहाय समिती सुद्धा स्थापन केली जाणार असुन तक्रार करण्यास वेबसाईट तसेच संपर्क क्रमांक मनपातर्फे उपलब्ध करून देण्यात आला आहे. अनधिकृत बॅनर,पोस्टर्स होर्डींग वर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलीस प्रश्न यांनी पुरेसे संरक्षण उपलब्ध करून देण्याचे तसेच आवश्यकता असल्यास हत्यारबंद पोलीस देखील पुरविण्याचे न्यायालयाने आदेशित केले आहे

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले,रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा,सिटी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके,दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वाढीवे,सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,संतोष गर्गेलवार,अनिलकुमार घुले तसेच राजकीय पक्षांचे व प्रिंटिंग प्रेसचे प्रतिनिधी उपस्थीत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मध्य रेल, नागपुर मंडल द्वारा बल्हारशाह स्टेशन पर संरक्षा संगोष्ठी का आयोजन

Wed Jan 1 , 2025
नागपूर :- नागपुर मंडल, मध्य रेल ने संचालन सुरक्षा और कर्मचारियों के कल्याण के प्रति अपनी प्रतिबद्धता के तहत, बल्हारशाह स्टेशन पर संरक्षा जागरूकता संगोष्ठी का सफल आयोजन किया। इस महत्वपूर्ण पहल का उद्देश्य रेलवे कर्मचारियों में सुरक्षा उपायों को सुदृढ़ करना और उनकी सुरक्षा जागरूकता को बढ़ाना था। यह संगोष्ठी नागपुर मंडल के सहायक मंडल संरक्षा अधिकारी (एडीएसओ) के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!