आम्ही काही बोलत नाही म्हणजे काहीही चालेल का? ही काय धर्मशाळा आहे का ? कोणीही कसेही वागायला?; विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात संतापले

मुंबई – सभागृहाचे कामकाज सुरु असताना अनेक सत्ताधारी सदस्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना गराडा घालून आपल्या अर्जावर शेरे व सह्या मारून घेण्याचे काम सुरु होते. काही काळ असाच प्रकार सुरु राहताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला, त्यांनी थेट आम्ही काही बोलत नाही म्हणजे काहीही चालेल का? ही काय धर्मशाळा आहे का ? कोणी ही कसेही वागायला? असा संतापही व्यक्त केला.

दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवारांचे रौद्ररूप पाहताच सर्व सत्ताधारी सदस्य आपापल्या जागेवर जाऊन बसले.

राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री बोलल्यानंतर सभागृहात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भोवती जमून सत्ताधारी सदस्यांनी गराडा करुन आपल्या अर्जांवर शेरे व सह्या करून घेण्याला सुरुवात केली. हा प्रकार काही काळ असाच सुरु राहताच विरोधी पक्षनेते चांगलेच संतापले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सत्ताधारी सदस्यांना समज दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे रुद्रारुप बघून पुन्हा सभागृह सुरळीत सुरू झाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ईशान्येकडील विद्यार्थ्यांचे विमानतळावर भाजयुमोतर्फे भव्य स्वागत!

Sat Mar 4 , 2023
नागपूर :- युवा संगम हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेतून ईशान्य प्रदेशातील तरुण आणि उर्वरित भारतातील युवकांमध्ये घनिष्ठ संबंध निर्माण करण्याचा उपक्रम आहे. केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ईशान्येकडील राज्ये आणि इतर राज्यांमधील तरुणांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याच्या उद्देशाने युवा संगम पोर्टल सुरू केले आहे. एका अधिकृत निवेदनानुसार, हा उपक्रम विविध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com