अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया :- शिंदे गट व ठाकरे गटांनी निवडणूक आयोगाकडे काही पर्याय दिले त्याच प्रमाणे त्या त्या पक्षाला निवडणूक आयोगाला त्यांच्या पक्षाचे चिन्ह मिळाले व त्यांच्या पक्षाचे नाव प्राप्त झाले, शेवटी पक्षाचे नाव किंवा चिन्ह जे त्या पक्षाचा झेंडा हाती घेतात त्या जनतेसाठी काय काम करता ते महत्वाचे असते.
नावानी निवडणूक जिंकता आल्या असत्या तर या देशामध्ये उत्तमातलं उत्तम नाव शोधून निवडणुका जिंकल्या असत्या जनतेची आपल्या कामातून मन जिंकावी लागतात आणि आता या मध्ये जे यशस्वी होतील. ते जनतेचा आशीर्वाद प्राप्त करतील. सुधीर मुनगंटीवार हे गोंदिया भाजपा मेळाव्यात आले असता या वेळेस माध्यमाशी बोलताना म्हणाले.