न्यायिक मागण्या पूर्ण न झाल्यास कांग्रेस तर्फे शासन ,प्रशासन विरोधात जनआंदोलन उभारणार-माजी नगराध्यक्ष शकुर नागानी.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 22:- स्थानिक तहसील व नगर परिषद प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या न्यायिक मागण्या पूर्ण न करता आश्वासनाची खैरात देत नागरिकांचा विश्वासघात करीत आहेत त्यामुळे न्यायिक हक्काच्या मागणीसाठी येत्या सात दिवसात प्रलंबित न्यायिक मागण्या पूर्ण न झाल्यास स्थानिक महायुती सरकार व नगर परिषद ,तहसील प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा ईशारा माजी नगराध्यक्ष शकुर नागांनी यांनी आज कांग्रेस भवन कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.

मागील दोन महिन्यांपूर्वी जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने कामठी तालुक्यातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले ज्यामुळे नाल्या काठावर राहणारे, खोलभागात राहणाऱ्या नागरिकांचे घरोपयोगी साहित्य सह मोठ्या नुकसानीचा फटका सहन करावा लागला तसेच शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले यासंदर्भात 28 जुलै ला कामठी नगर कांग्रेस कमिटी चे शिष्टमंडळ कामठी तहसीलदार यांच्याशी भेटून नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर खावटी तसेच नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राज्य शासन तसेच स्थानिक प्रशासनाला करण्यात आले होते यावर तहसीलदार ने समाधानकारक उत्तर देत नगर परिषद तर्फे सर्वे करून नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई देणार असल्याचे आश्वासित केले मात्र हे आश्वासनाची खैरात ठरली असून नागरिक अजूनही नुकसानग्रस्त निधी पासून वंचीत आहेत तसेच सन 2011 पूर्वी पासून अतिक्रमित धारक नागरिकांचे घरे नियमानुकूल करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यासाठी 8500 नागरिकांनी स्थायी पट्ट्यासाठी नगर परिषद ला अर्जद्वारे मागणी केली मात्र अजून पावेतो फक्त 1500 नागरिकांना स्थायी पट्टे वितरित करण्यात आले मात्र त्यांना आखीव पत्रिका वितरित करण्यात आले नाही परिणामी नागरिकांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा प्रश्न अजूनही अधांतरी आहे परिणामी .8 हजार च्या जवळपास पात्र लाभार्थी अजूनही पंतप्रधान आवास योजने पासून वंचीत आहेत तेव्हा या सर्व बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेत अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना खावटी व नुकसानग्रस्त अनुदान देणे तसेच अतिक्रमण नियमानुकूल चा प्रश्न मार्गी लावणे या दोन्ही न्यायिक समस्या येत्या सात दिवसात पूर्ण न झाल्यास येथील कांग्रेस पक्षातर्फे राज्याचे महायुती सरकार तसेच नगर परिषद,तहसील प्रशासना विरोधात मोठे जण आंदोलन उभारण्यात येणार असल्याचा ईशारा माजी नगराध्यक्ष शकुर नागानी यांनी आज नगर कांग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेतुन दिला.

याप्रसंगी कांग्रेस पदाधिकारी प्रसन्ना तिडके, जी प सदस्य नाना कंभाले, माजी नगराध्यक्ष नीरज यादव, कांग्रेस शहराध्यक्ष रमेश दुबे, लक्ष्मण संगेवार, आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रनाळ्यात जुगार अड्यावर धाड,7 जुगारी ताब्यात,1 लक्ष 4 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sun Sep 22 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील एका पॉश टाऊनशीप च्या बाजूला मोकळ्या जागेत अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाल्याची कारवाही गतरात्री 8 दरम्यान केली असून या धाडीतून सात जुगाऱ्याना ताब्यात घेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाही करीत घटनास्थळाहुन 52 तास पत्ते, 3 महागडे मोबाईल,दोन दुचाकी व नगदी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com